घरमनोरंजनसायरा बानू यांना हिंदुजा रुग्णालयातून डिस्चार्ज

सायरा बानू यांना हिंदुजा रुग्णालयातून डिस्चार्ज

Subscribe

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांना काही दिवसांपूर्वी श्वास घेण्यास त्रास, उच्च रक्तदाब आणि शुगरच्या समस्येमुळे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता सायरा बानो यांची तब्येत बरी झाली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू होते. रक्तदाब आणि शुगरच्या समस्येमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. “सायराजी यांची प्रकृती ठीक असून त्या रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहेत. तुम्हा सर्वांच्या प्रार्थनांसाठी धन्यवाद”, अशी माहिती सायरा यांचे निकटवर्तीय फैसल फारुखी यांनी ‘पीटीआय’ला दिली.

गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र त्यावेळी करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासामध्ये त्यांना हृदयाशी निगडीत समस्या असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांची एंजिओग्राफी करणे आवश्यक आहे. परंतू सायरा बानू यांना एंजिओग्राफी करण्यास नकार दिला असल्याचे सायरा बानू यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी पीटीआयला सांगितले. सायरा बानो यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर नितिन गोखले यांनी टाइम्सला दिलेल्या एका मुलाखती दरम्यान सांगितले आहे की, सायरा यांचे लेफ्ट वेंट्रिकुलर निकामी झालं आहे. यामुळे त्यांची अँजियोग्राफी करावी लागणार आहे. सध्या त्यांच्या प्रकृतीत हळू-हळू सुधारणा होत आहे. परंतु काही काळानंतर पुन्हा त्यांना एंजिओग्राफीसाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागेल. एंजिओग्राफी करण्यासाठी त्यांची परवानगी असणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु, अद्याप त्यांनी एंजिओग्राफीसाठीची परवानगी दिली नसल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या सहवासात ५४ वर्ष असणाऱ्या अभिनेत्री सायरा बानो यांना गेल्या दोन दिवसांपूर्वी श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. दिलीप कुमार यांच्या जाण्याला दोन महिने उलटून गेले असले तरी सायरा बानो या दुखाःतून स्वतःला सावरू शकल्या नाहीत. ७ जुलै रोजी दिलीप कुमार यांचे निधन झाले. दिलीप कुमार यांच्या निधनाने सायरा बानो खूप खचल्या होत्या तेव्हापासून काहिशा त्या नैराश्यात असल्याचे सांगितले जात आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -