घरमुंबईFYJC Admission 2021 :अकरावी प्रवेशाची तिसरी यादी जाहीर

FYJC Admission 2021 :अकरावी प्रवेशाची तिसरी यादी जाहीर

Subscribe

मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर या महापालिका क्षेत्रात आज, सोमवारी सकाळी १० वाजता अकरावी ऑनलाइन प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच इनहाऊस, मॅनेजमेंट कोटा, आणि अल्पसंख्याक कोट्यातील प्रवेशाचीही तिसरी गुणवत्ता यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या वर्षामधील मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इ. ११ वीच्या वर्गांचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहेत. ११ वी ऑनलाईन प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी आज ऑनलाईन जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये शाखानिहाय अर्ज केलेले विद्यार्थी खालीलप्रमाणे आहेत.

कला १५ हजार ५५१, वाणिज्य ६५ हजार ३१८, विज्ञान ३६ हजार ०३५ आणि एचएसव्हीसी २ हजार ४२९ असे १,१९,३३३ एकूण कोटा वगळून असेलल्या जाहा आहेत. तर एकूण अर्ज सादर केलेले विद्यार्थी कला शाखेतील ८०००, वाणिज्य ६७६७९, विज्ञान ३४२६०, एचएसव्हीसी ५२२ आहेत. यासह अॅलोटमेंट झालेले विद्यार्थी कला ३१५२ , वाणिज्य २५५३९, विज्ञान ११०५८,एचएसव्हीसी २१५ असे एकूण ३९,९६४ विद्यार्थी आहेत.

- Advertisement -

अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या तिसऱ्या गुणवत्ता यादीत प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना १५ सप्टेंबरपर्यंत संबधित कॉलेजात जाऊन प्रवेश घेता येणार आहे. तिसऱ्या गुणवत्ता यादीत ज्या विद्यार्थ्यांना जागा मिळतील. त्यांना आपल्या लॉगइनवर कॉलेजांची माहिती आणि कट ऑफही पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच यासाठीचे एसएमएस विद्यार्थ्याला पाठवले जाणार आहेत. या गुणवत्ता यादीत जागा मिळालेल्या विद्यार्थ्यांना १५ सप्टेंबरपर्यंत संबंधित कॉलेजांमध्ये जाऊन प्रवेश घेणे बंधनकारक असेल.

- Advertisement -

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -