घरताज्या घडामोडीAfghanistan: अजब न्याय! पाव चोरल्याबद्दल दोन मुलांविरोधात तालिबानी खटला दाखल करणार

Afghanistan: अजब न्याय! पाव चोरल्याबद्दल दोन मुलांविरोधात तालिबानी खटला दाखल करणार

Subscribe

अफगाणिस्तानमध्ये तालिबानने कब्जा केल्यानंतर देशातील आर्थिक व्यवस्था कोलमडली आहे. लोकांचे व्यवसाय वेगाने बंद होत आहेत. परदेशी संस्थांनी आणि अमेरिकेने देशाला येणार पैसा गोठवला आहे म्हणजेच बंद केला आहे. त्यामुळे अजूनच आर्थिक संकटामध्ये भर पकडली आहे. तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर काही दिवसानंतर देशात भूकमारी ही समस्या उद्भवले असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र आता ती गोष्ट खरी होत आहे. आर्थिक संकटात असलेल्या अफगाणिस्तानमधील लोकांना भूकमारीच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. एकीकडे खाण्या-पिण्याच्या वस्तूंमध्ये टंचाई निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे या वस्तू घेण्याची लोकांकडे पैसेच नाही आहेत. त्यामुळे अनेक अफगाण नागरिक पोटासाठी चोरीचा मार्ग अवलंबत आहेत. फोटोमधील दोन मुलांनी देखील भूकेसाठी बेकरीतून पाव चोरी केले. मात्र त्यांना आता तालिबानी दहशतवाद्यांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरोधात खटला दाखल करणार आहेत. सध्या या मुलांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काबूलमधील या मुलांनी भुकेच्या पोटी बेकरीतून पावाच्या दोन लादी चोरल्या. त्यामुळे या दोन मुलांना तालिबानी दहशतवाद्यांनी पकडून एका खांबाला बांधून ठेवले आहे. दरम्यान यामधील एका मुलाला तू असं का केलंस असं विचारलं असता तो म्हणाला की, ‘माझ्या घरी तीन दिवसांपासून खायला काहीच नाही. माझे आई-बाबा आणि मी उपाशी आहे. आम्हाला कामधंदा नाही. त्यामुळे पैसे मिळत नाही. त्यामुळे खायचे काय प्रश्न आहे.’ आता तालिबानी दहशतवादी या दोन्ही मुलांविरोधात खटला चालवणार आहेत.

- Advertisement -

अफगाणिस्तानचे स्वतंत्र पत्रकार हिजबुल्लाह खान हे नेहमी आपल्या देशातील परिस्थिती संदर्भात ट्वीट करत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी या दोन मुलांचा फोटो शेअर केला होता. त्यावेळेस त्यांनी फोटो शेअर करत लिहिले होते की, ‘देशात ८० टक्के लोकं भीषण भूकमारीच्या संकटाशी सामना करत आहेत. हे सर्व तालिबान सरकारच्या अपयशामुळे होत आहे. गेल्या दोन दिवसात अफगाणिस्तानमधील वेगवेगळ्या प्रांतामध्ये काही जणांनी भूकमारीमुळे आत्महत्या केली आहे.’ अशी भीषण परिस्थिती अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार आल्यापासून झाली आहे.

- Advertisement -


हेही वाचा – Afghanistan: तालिबानची क्रूरता सुरुच! फोटोग्राफर मुर्तजा समधीला चढवणार फासावर


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -