घरताज्या घडामोडीVaccination : दुसऱ्या डोसनंतरही पुणेकरांना कोरोनाची लागण, अजितदादांनी सांगितले कारण

Vaccination : दुसऱ्या डोसनंतरही पुणेकरांना कोरोनाची लागण, अजितदादांनी सांगितले कारण

Subscribe

पुणे महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांचा दर २.१ इतका आहे. पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात मध्ये २.२ तर पुणे ग्रामीणमध्ये ३.८ इतका दर आहे.मागच्यापेक्षा परिस्थिती सुधारली असल्याचे मत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालक मंत्री अजित पवार यांनी आज स्पष्ट केले. पुण्यात आठवड्याच्या आढावा बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मागील आठवड्याच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या आकडेवारीत सुधारणा झाल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना लसीकरणानंतरही नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाची लागण होत असल्याचे एका सर्वेक्षणातून आढळल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. (Pune citizens corona infected post covid-19 vaccination say ajit pawar)

काय आहे पुण्यातील कोरोनाची सद्यस्थिती ?

मृत्यू दराच्या बाबतीत पुणे महापालिका क्षेत्रात २.१ होता. पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात १.५ इतका कमी झाला आहे. पुणे ग्रामीण ०.५ वरून ०.८ झाला आहे. गेल्या आठवड्यात ५ लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. लसीकरणामध्ये ५ टक्के वाढ झाली आहे. लसीकरणानंतर किती जणांना कोरोनाची बाधा होते यासाठीचे एक सर्वेक्षण पुण्यात झाले असल्याचे अजित पवारांनी सांगितले. त्यामध्ये ०.१९ टक्के इतक्यांना पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याचे लक्षात आले आहे. तर दुसरा डोस घेतल्यानंतर ०.२५ टक्के इतक्या जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास आले आहे.

- Advertisement -

दुसरा डोस घेतल्यानंतर नागरिक नियम पाळत नाहीत. म्हणूनच दुसऱ्या डोसनंतरही कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आले आहे. अनेक नागरिकांकडून मास्क न वापरणे, कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करणे यामुळेच कोरोनाची लागण होत असल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. त्यामुळे लस घेतली म्हणजे कोरोनाचे नियम पाळायचे नाहीत ही मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पुण्यात सिरींजचा तुटवडा 

काही कंपन्यांनी सीएसआरच्या माध्यमातून लस उपलब्ध करून देण्याचे कबुल केले आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी पाच लाख लसींचा पुरवठा सीएसआरएच्या माध्यमातून मिळवून दिला आहे. पण या लसीच्या डोससाठी सिरींजचा तुटवडा आहे. म्हणूनच पुणे महापालिकेला तसेच इतर जिल्हाधिकाऱ्यांनाही डीपीडीसीच्या निधीतून लस उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. केंद्राकडून लसीचा पुरवठा केला जातो. पण केंद्रालाही सिरींजचा तुटवडा भासत असल्याचे त्यांनी सांगितले.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -