घरमहाराष्ट्रपेट्रोल-डिझेल, गॅसच्या किंमती वाढवून केंद्र सरकार पैसे कमवतंय; जयंत पाटलांची टीका

पेट्रोल-डिझेल, गॅसच्या किंमती वाढवून केंद्र सरकार पैसे कमवतंय; जयंत पाटलांची टीका

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी महागाईवरुन केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. महागाई भारतामध्ये पेट्रोल-डिझेल, गॅस, सिएनजीच्या किंमती वाढवून केंद्र सरकार पैसे कमवतंय, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. नाशिकमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

देशभरात सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. पेट्रोल-डिझेलच्या प्रति लिटर किंमती १०० रुपयांच्या वर गेल्या आहेत. घरगुती सिलेंडर, सीएनजी गॅसच्या किंमती देखील वाढल्या आहेत. यावरुन जयंत पाटील यांनी जोरदार टीकास्त्र डागलं आहे. “भारतामध्ये पेट्रोल-डिझेल, गॅस, सिएनजीच्या किंमती वाढवून केंद्र सरकार पैसे कमवतंय. या देशातल्या सामान्य गोरगरीबांच्या खिशाला कात्री लागत आहे. पेट्रोल-डिझेल, गॅसचे दर वाढले तर सगळ्याच गोष्टींचे दर वाढतात त्यामुळे या देशात महागाई आहे. एकीकडे कोरोना, दुसरीकडे त्यांच्या उत्पन्नावर मर्यादा आलेली आहे. मोदी सरकार दर सतत वाढवत राहिलेले आहेत. हा फार मोठा अन्याय देशातील जनता सहन करत आहेत. मध्यमवर्गीय ज्यांचं उत्पन्न मर्यादीत आहे ते तर फार मोठ्या संकटात आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किंमती जवळपास आणून मोदींनी शेतकऱ्यांना देखील फार मोठा आर्थिक फटका दिलेला आहे, हे भारतातील शेतकऱ्यांच्या लक्षात आलेलं आहे,” असं जयंत पाटील म्हणाले.

- Advertisement -

जे बरोबर येतील त्यांच्याबरोबर आघाडी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीतील पक्ष आघाडी करणार का या प्रश्नावर बोलताना जयंत पाटील यांनी प्राथमिकता आमची एकत्रित लढवण्यावर आहे, अशी प्रतिक्रिया दिली. “राष्ट्रवादीची भूमिका वारंवार सांगतलेली आहे. प्राथमिकता आमची एकत्रित लढवण्यावर आहे. महाविकास आघाडी सरकारमधले एक घटक आहोत. स्थानिक परिस्थितीत टोकाची भूमिका झाली तर जे बरोबर येतील त्यांच्याबरोबर आघाडी करावी लागेल, पण हा स्थानिक प्रश्न आहे. प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक शहरात वेगवेगळी परिस्थिती असू शकते,” असं जयंत पाटील म्हणाले.

यंत्रणांनी परमबीरांना परत आणण्याचं काम तरी करावं

परमबीर सिंह प्रकरणावर दोन दिवसांपूर्वी भूमिका व्यक्त केलेली आहे. अनिल देशमुख यांना नाहक अडचणीत आणण्याचं काम सुरु आहे, खडसेंचं देखील तेच आहे. आता सुडाचं राजकारण सुरु आहे. त्याबद्दल दोन दिवसांपूर्वीच बोललो आहे. परमबीर सिंह यांच्यावर अतिशय गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस त्यांना शोधत आहेत. ज्या यंत्रणा आहेत लोकांना माहिती आहे कोण कुणाचा बचाव करतंय. त्यामुळे त्या यंत्रणांनी किमान आता गेलेल्या परमबीर सिंह यांना परत आणण्याचं काम तरी करावं, असं जयंत पाटील म्हणाले.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -