घरताज्या घडामोडीIndian Railway: रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आता प्लॅटफॉर्म तिकीटासोबत भरावे लागणार 'युझर्स...

Indian Railway: रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आता प्लॅटफॉर्म तिकीटासोबत भरावे लागणार ‘युझर्स चार्ज’

Subscribe

युझर्स चार्ज हे प्रवाशांच्या तिकीटाच्या चार्जेसमध्येच समाविष्ट केले जाणार

प्रवास करण्यासाठी भारतीय रेल्वे (Indian Railway) सर्वात चांगले आणि स्वस्त वाहतूकीचे साधन आहे. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करत असतात. मात्र आता रेल्वे स्थानकांवरुन प्रवास करणे महाग होणार आहे. प्रवाशांना सोडायला रेल्वे स्थानकावर येणाऱ्या व्यक्तींना आतापर्यंत केवळ प्लॅटफॉर्म तिकीट काढवे लागत होते. मात्र आता त्यांना व्हिजिटर फी देखील भरावी लागणार आहे. ज्यालाच युझर्स चार्जेस असे नाव देण्यात आले आहे. राज्यासह देशभरातील अनेक रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना हे युजर्स चार्जेस भरावे लागणार आहेत. IRSDC (Indian Railway Stations Development Corporation) आणि RLDA (Rail Land Development Authority) यांनी हा प्रस्ताव सादर केला होता त्याला रेल्वे मंत्रालयाने मंजूरी दिली आहे. क्रेंद्रीय कॅबिनेट समोर याविषयी अंतिम निर्णय घेण्यात आला. IRSDC लवकरच याबाबत नोटिफिकेशन काढणार आहे.

विमानतळाच्या पार्श्वभूमीवर देशातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचा विकास केला जाणार आहे. IRSDCआणि RLDA या संस्था रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी काम करत आहेत. महाराष्ट्रातील पुणे, सीएसएमटी,कल्याण,ठाणे, ठाकुर्ली,एलटीटी यासारख्या प्रमुख रेल्वे स्थानकांचा विकास केला जाणार आहे. युझर्स चार्ज हे प्रवाशांच्या तिकीटाच्या चार्जेसमध्येच समाविष्ट केले जाणार आहेत.

- Advertisement -

युझर्स चार्ज किती असणार?

प्रवशांना १० ते ४० रुपये अतिरिक्त युझर्स चार्जेस द्यावे लागणार आहेत. तिकीटाच्या दरानुसार हे चार्जेस ठरवले जाणार आहेत. प्रवाशांना रेल्वे प्लॅटफॉर्मवर सोडायला येणाऱ्या व्यक्तीला केवळ प्लॅटफॉर्म तिकीट काढावे लागत होते मात्र आता त्या व्यक्तीला युझर्स चार्ज देखील द्यावा लागेल असे IRSDCचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.के.लोहिया यांनी म्हटले आहे. यासंदर्भात लवकरच नोटिफिकेशन निघेल आणि त्यानंतर युझर्स चार्जेस लागू होतील असेही ते म्हणाले.


हेही वाचा – मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर चेंगराचेंगरीचे वातावरण, प्रवाशांच्या फ्लाईट्स चुकल्या

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -