घरपालघरभाईंदरसह पालघरच्या ग्रामीण भागात कडकडीत बंद; वसई विरारमध्ये संमिश्र प्रतिसाद

भाईंदरसह पालघरच्या ग्रामीण भागात कडकडीत बंद; वसई विरारमध्ये संमिश्र प्रतिसाद

Subscribe

उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला मीरा भाईंदरसह पालघरच्या ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला मीरा भाईंदरसह पालघरच्या ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वसई विरार शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंददरम्यान कोणाताही अनुचित प्रकार घडला नाही. बंदच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. पालघर, बोईसर आणि डहाणू शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदमध्ये सहा आसनी व तीन आसनी रिक्षा चालक सहभागी झाले होते. त्यामुळे रस्ते ओस पडलेले होते. पालघरपूर्वेकच्या मनोरमध्ये बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मनोर बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला. रिक्शा संघटनांनी बंदमद्य सहभाग नोंदवल्याने रस्त्यांवर शुकशुकाट होता. मुंबई-अहमदाबाद हायवेवर वाहनांची संख्या फारशी नव्हती. तसेच महामार्गावरील हॉटेल-ढाबेही बंद ठेवण्यात आले होते. मनोर शहरात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली.

सफाळे भागातील बाजारपेठ अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद होती. बाजारपेठे लगतच्या गावापाड्यांमध्ये मात्र या बंदचा फारसा परिणाम दिसून आला नाही. दुपारनंतर मात्र येथील जनजीवन पूर्ववत होण्यास सुरुवात झाली. सफाळे बाजारपेठेतील व्यापारी असोसिएशनने स्वतःहूनच आपली दुकाने बंद ठेवली होती. सोमवार हा आठवडे बाजाराचा दिवस असल्याने बंदमुळे सगळ्यांचीच गैरसोय झाली होती. बोईसर शहरातील एमआयडीसी औद्योगिक वसाहत वगळता शहरातील दुकाने, व्यापारी आस्थापने बंद होते. मेडिकल, डेअरी, अत्यावश्यक सेवा वगळता पूर्णपणे बंद दिसून आला. महामंडळाची बससेवा सुरू होती. रिक्शा तुरळकपणे रस्त्यावर धावताना दिसत होत्या. डहाणू शहरातील बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. बाजारपेठा आणि वाहतूक बंद असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आले.

- Advertisement -

विक्रमगड शहरासह ग्रामीण भागात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शिवसेना या पक्षाच्या कार्यकर्त्यानी सकाळी केंद्र सरकार विरोधात विक्रमगड शहरात निषेध रॅली काढण्यात आली होती. यावेळी छत्रपती शिवाजी चौकात आंदोलन करून लखीमपूर हिंसाचाराचा निषेध करत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील दोषींवर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई केली गेली पाहीजे, अशी यावेळी मागणी करण्यात आली.

बंदला वाड्यातील नागरिकांनी संमिश्र प्रतिसाद दिला. सकाळी बंद असलेली दुकाने दुपारनंतर उघडण्यात आली. सकाळच्या सुमारास काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत केंद्र सरकारच्याविरोधात घोषणा देत शहरात रॅली काढण्यात आली होती. वाड्यातील बस स्थानकातून निघालेली रॅली भाजी मार्केट, वाणी आळी, परळी नाका, मस्जिद नाका, पाटील आळी या मार्गे बस स्थानकात समाप्त करण्यात आली.
मोखाडा तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. मोखाडा बस स्टँडजवळ सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला. तसेच यावेळी मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जव्हार तालुक्यातील सर्वच व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून केंद्रातील भाजपा सरकारचा निषेध नोंदवला. जव्हारच्या गांधी चौकात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्रसरकार विरोधात घोषणा देऊन निषेध व्यक्त केला.

- Advertisement -

मीरा भाईंदर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापारी, दुकानदार आणि रिक्शाचालक बंद मध्ये सहभागी झाल्याने रस्त्यावर शुकशुकाट पहावयास मिळाला. काँग्रेसकडून शहरात बाईक रॅली काढण्यात आली. या बाईकला झेंडे लावून भाजपा विरोधात नारे व घोषणाबाजी करण्यात आली होती.

वसई विरार शहरात मात्र बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात महारक्तदान शिबीर ठेवल्याने पदाधिकारी-नेते रक्तदानासाठी वसई विरारमधून बसेस भरून कार्यकर्त्यांना घेऊन गेले होते. त्यामुळे बंदसाठी शिवसैनिकांमध्ये फारसा उत्साह दिसून आला नाही. तर बहुजन विकास आघाडीने बंदला पाठिंबा जाहिर केला असला तरी बंदसाठी बविआकडून कोणतेही प्रयत्न केले गेले नाहीत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आपल्या ताकदीनुसार बंदच्यादिवशी निर्देशने केली. परिणामी वसई विरार परिसरात बंदचा परिणाम जाणवला नाही. काही भाग वगळता वसई विरार परिसरातील बाजारपेठा आणि रिक्षा वाहतूक नेहमीप्रमाणे सुरुच होती.

हेही वाचा –

मावळमध्ये नेत्याच्या मुलाने गोळीबार केला नव्हता, जितेंद्र आव्हाडांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -