घरठाणेपरमबीर सिंह यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट

परमबीर सिंह यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट

Subscribe

मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात ठाणे कोर्टाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. तसेच त्यांना अटक करा आणि कोर्टात हजर करा, असे निर्देश ठाणे मुख्य न्यायदंडाधिकारी आर. जे. तांबे यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात ठाणे शहर पोलिसांना दिले.

चंदीगड येथील रहिवासी असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सिंह यांच्यावर ठाणेनगर पोलीस ठाण्यात ३८४, ३८६, ३८७, ३८९, ३९२, ३२४, ३२३, ५०६, ५०६(२),१६६, नुसार गुन्हा दाखल आहे. तसेच आयपीसीच्या १०९, १२० ब आणि आर्म्स अ‍ॅक्टच्या ३, २५ अन्वये गुन्हे दाखल आहे.

- Advertisement -

त्या गुन्ह्यात ठाणे मुख्य न्यायदंडाधिकारी तांबे यांनी परमबीर सिंह यांना अटक करून कोर्टात हजर करण्याबाबचे निर्देश नुकतेच ठाणे नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिले आहेत. त्या संदर्भात २६ ऑक्टोबर रोजी स्थायी अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला आहे. त्यानुसारच सिंह यांना अटक करण्यासंदर्भात ठाणे शहर पोलीस लवकरच पाऊले उचलण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -