घरताज्या घडामोडीअमरावतीमध्ये दुकानांना जाळण्यात आलं, हे कुणी केलं?, असदुद्दीन ओवैसी म्हणतात...

अमरावतीमध्ये दुकानांना जाळण्यात आलं, हे कुणी केलं?, असदुद्दीन ओवैसी म्हणतात…

Subscribe

४ टक्के मुस्लिम फक्त पदवीधर...

महाविकास आघाडीचे सरकार असून धर्मस्वातंत्र्याला वाचवण्याची गोष्ट करत आहेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत मंदीर आणि मस्जीदचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला फटकारलं आहे. दरम्यान, त्रिपुरा घटनेचे पडसाद अमरावतीमध्ये होतील हेही तुम्हाला माहिती नव्हतं का?, असा सवाल उपस्थित करत दुकानांची जेव्हा जाळपोळ करण्यात येत होती. तेव्हा सरकारने बघ्याची भूमिका का स्वीकारली. असं म्हणतं ओवैसी यांनी महाविकास आघाडी सरकारवर थेट आरोप केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं की, आम्ही बाबरी मस्जीदला शहीद केलं होतं. लाज वाटली पाहीजे लोकांना कारण मुस्लिम बांधवांना मी सतत सांगत होतो. तुम्ही यांच्यावर विश्वास ठेवू नका तुम्ही फक्त तुमच्यावर विश्वास ठेवा. असं असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी हे सोलापूर दौऱ्यावर होते. तेव्हा त्यांनी मविआ सरकरावर थेट आरोप केले आहेत.आपली सत्ता मजबूत करण्यासाठी आणि कुटुंबियांना वाचवण्यासाठी तसेच भ्रष्टाचाराला लपवून ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने धर्मनिरपेक्षेतेला नष्ट केलं आहे. धर्मनिरपेक्षेताला या लोकांनी नष्ट केला असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष आता राज्य करत आहेत. मुस्लिम लोकांना आरक्षण देण्यासाठी कधीही काहीही बोलत नाहीत. चर्चा फक्त वानखेडे यांचीच होते. असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

पुढे ओवैसी म्हणाले की, तुम्हाला तलवार कधीही जीवंत ठेवू शकत नाही. तर फक्त पेनचं तुम्हाला जीवंत ठेवू शकतं. मुंबई हायकोर्टाने मुस्लिम लोकांच्या ५० टक्के आरक्षणाबाबत कधीही वक्तव्य केललं नाहीये. जे मुस्लिम बांधव सामाजिक, शैक्षणिक बॅकवर्ड आहेत. त्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने मोठं वक्तव्य केलेलं आहे. नोकरदगार वर्गाचं आरक्षण वाढलं आहे. परंतु तुम्ही तालीममध्ये का नाही दिलंय?, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याबाबत देखील ओवैसी यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

४ टक्के मुस्लिम फक्त पदवीधर

महाराष्ट्रामध्ये ११ टक्के मुस्लिम बांधव आहेत. तसेच ४ टक्के मुस्लिम फक्त पदवीधर आहेत. महाराष्ट्रामध्ये १.९ टक्के हिंदू बांधव आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील ८.७ टक्के लोकं पदवीधर आहेत. तर मुलिस्मांची संख्या ही हिंदूंच्या अर्धी आहे. पदवीधर संख्या कमी असली तरी ड्रॉप आऊट रेट सुद्धा वाढला आहे. का हे कलम १५ आणि १६ च्या विरोधात नाहीये. तसेच त्यांनी शिक्षणावरून महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे.

अमरावतीमध्ये झालेल्या त्रिपुरा घटनेच्या दंगलीवर असदुद्दीन ओवैसी यांनी भाष्य केलं आहे. अमरावतीमध्ये जे काही झालं ते बरं नव्हतं. कशाप्रकारे दुकानांना जाळण्यात आलं. कुणी केलंय हे?, कोणत्याही समाजाचा व्यक्ती दुकान चालवू दे. पण सरकार काय करतंय. तुम्हाला कायदा आणि सुव्यवस्था ठेवता येत नाही का?, त्रिपुरा घटनेचे पडसाद अमरावतीमध्ये होतील हेही तुम्हाला माहिती नव्हतं का?, असा सवाल उपस्थित करत दुकानांची जेव्हा जाळपोळ करण्यात येत होती. तेव्हा सरकारने बघ्याची भूमिका का स्वीकारली. असं म्हणतं ओवैसी यांनी महाविकास आघाडी सरकारवर थेट आरोप केला आहे.

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -