घरताज्या घडामोडीNoida International Airport: पंतप्रधान मोदींच्या हस्ते नॉयडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आज भूमीपूजन, वाचा...

Noida International Airport: पंतप्रधान मोदींच्या हस्ते नॉयडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आज भूमीपूजन, वाचा वैशिष्ट्ये

Subscribe

उत्तर प्रदेशमधील नोएडा येथील जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे म्हटले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज जगातील चौथ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमीपूजन होणार आहे. त्यानंतर नोव्हेंबर २०२४ पर्यंत या विमानतळावरून उड्डाण सुरू होण्याची आशा आहे.

नोयडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे वैशिष्ट्ये

  • या विमानतळावर एकूण ५ धावपट्टी असतील. पहिल्या टप्प्यात २ धावपट्टी तयार केल्या जातील. तर दुसऱ्या टप्प्यात ३ धावपट्टी तयार केल्या जातील.
  • हे विमानतळ एकूण ३३०० एकर जमिनीवर तयार केले जाईल. या विमानतळासाठी जवळपास ३० हजार कोटी रुपये लागतील.
  • नोयडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उत्तर धावपट्टी आणि दक्षिण धावपट्टी अशा दोन धावपट्टी तयार होती. उत्तर धावपट्टीवरच VVIP टर्मिनल असेल. म्हणजेच उत्तर धावपट्टीवरून VVIP लोकांची विमाने उड्डाणे करतील. धावपट्टीची लांबी ४ किलोमीटरहून अधिक असणार आहे.
  • दोन्ही धावपट्टीवर एकूण १८६ विमान पार्क करण्यासाठी स्टँड केले जातील.
  • विमानतळाच्या जवळ सार्वजनिक वाहतुकीच्या रुपात आणखीन एक पर्याय उपलब्ध असेल. ज्यामध्ये रेल्वे स्टेशनचा समावेश असेल. येथून तुम्ही मेट्रो किंवा हायस्पीड ट्रेनमधून प्रवास करून जवळच्या शहरात जाऊ शकता.
  • मेट्रो स्टेशनच्या जवळ हवाई प्रवाशांना बसण्यासाठी एक वेगळ्या टर्मिनलची व्यवस्था केली जाईल.
  • उत्तर आणि दक्षिण दोन्ही धावपट्टी दरम्यान एटीसी टॉवर बांधले जाईल. तसेच दक्षिण धावपट्टीच्या येथे बचाव आणि अग्निशमन यंत्रणेची इमारत असेल.
  • तसेच विमानतळाजवळ एक मोठे सेंट्रल किचन तयार केले जाईल.
  • दक्षिण धावपट्टीच्या उजव्या बाजूला पावसाचे पाणी साठवण्यासाठी एक तलाव बांधले जाईल.
  • याशिवाय यमुना एक्स्प्रेसवे, इस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेसवे आणि जवळील मुख्य रस्ते आणि राजमार्गांना नोयडा विमानतळ जोडले जाईल. नोयडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून फक्त परदेशातील प्रवास होणार नाही तर देशातील सर्वात मोठे कार्गो हब विमानतळावर असणार आहे. विमानतळावरील कार्गो टर्मिनलची क्षमता २० लाख मेट्रिक टन असेल, ती वाढवून ५० लाख मेट्रिक टन करण्यात येईल. औद्योगिक उत्पादनांची वाहतूक या कार्गो हबमुळे सुलभ होईल. तसेच यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थानिक उत्पादने नेण्यास मदत होईल.

जवळच्या शहरांपासून नोयडा विमानतळावर किती दूर वाचा….

  • नोयडा शहरापासून ६० किमी दूर
  • गुडगावपासून ८० किमी दूर
  • गाझियाबादपासून ७५ किमी दूर
  • आगरा पासून १३० किमी दूर
  • आयजीआय विमानतळापासून ७२ किमी दूर
Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -