घरक्रीडाIND vs NZ 1st Test : अश्विनला वारंवार इशारा दिल्याने गावस्कर संतापले;...

IND vs NZ 1st Test : अश्विनला वारंवार इशारा दिल्याने गावस्कर संतापले; म्हणाले… अंपायरला काय दंड?

Subscribe

भारत आणि न्यूझीलंडमध्ये सध्या सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी अंपायर आणि अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन यांच्यात काहीसा संघर्ष पहायला मिळाला होता

भारत आणि न्यूझीलंडमध्ये सध्या सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी अंपायर आणि अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन यांच्यात काहीसा संघर्ष पहायला मिळाला होता. दरम्यान सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचा फिरकीपटू अश्विन चांगल्या लयमध्ये होता त्याने चमकदार गोलंदाजी करून न्यूझीलंडचा पहिला बळी पटकावला होता. भारतीय संघासाठी खतरनाक म्हणून समोर येत असलेल्या विल यंगला त्याने ८९ धावांवर बाद केले. यानंतर अश्विन टॉम लाथमला देखील माघारी पाठवण्यात यशस्वी झाला. यादरम्यान अश्विन गोलंदाजी करत असताना त्याच्या फॉलो थ्रोवर अंपायर नाराज होते. अंपायर नितिन मेनन यांनी कित्येत वेळा त्याला अडवले. त्यामुळे अश्विन आणि अंपायरमध्ये वाद झाला. या घटनेनंतर भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनिल गावस्कर आपली प्रतिक्रिया देताना अंपायरवर चांगलेच भडकले.

अश्विनला वारंवार समज दिल्यानंतर नाराज गावस्कारांनी अंपायरवर निशाणा साधला आहे. त्यांनी सांगितले, का याच्यासाठी अंपायरला शिक्षा नाही झाली पाहिजे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना गावस्करांनी अंपायरचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी आणखी सांगितले की, “कर्णधार अजिंक्य रहाणे अंपायरला हे सांगण्यासाठी आला होता की अश्विन गोलंदाजीच्या खतरनाक भागापासून लांब आहे”. गावस्करांच्या म्हणण्यानुसार त्यांना वाटते की, अंपायरला हे अवघड आहे कारण तो पाहू शकत नाही की हे काय आहे. यासाठी अंपायरला काही शिक्षा आहे का, तो पाहू शकणार नाही असे कुठेतरी लिहिले आहे. गावस्कर पुढे म्हणाले की, खेळादरम्यान चेंडू हेल्मेटला लागला तर त्याच्यासाठी दंड आहे, अश्विनने असेच सुरू ठेवले तर त्याला काय शिक्षा? असा प्रश्न गावस्करांनी विचारला.

- Advertisement -

अंपायर नितीन मेनन आणि अश्विन यांच्यातील वाद

सामन्यादरम्यान रवीचंद्रन अश्विन न्यूझीलंडचा फलंदाज टॉम लाथमला राउंड द विकेट गोलंदाजी करत होता. यादरम्यान अश्विन गोलंदाजी करताना सरळ जात नव्हता आणि अंपायर आणि नॉन स्ट्रायकरला ओलांडून जात होता. यावरून फिल्डिंगचे अंपायर नितिन मेनन नाराज होते. अश्निनने गोलंदाजी करताना अंपायरच्या इशाराकडे दुर्लक्ष केल्याने त्यांनी अश्निनला ४ वेळा इशारा दिला. हा प्रकार तेव्हा अधिक वाढला जेव्हा अश्विन अंपायर सोबतची चर्चा अर्धवट सोडून तिथून निघाला. यानंतर अंपायर नितीन मेनन यांनी त्याला पुन्हा समज दिली. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. अश्विन धोक्याच्या भागात येत असल्याचे अंपायरचे म्हणणे होते. यादरम्यान कर्णधार अजिंक्य रहाणेही अंपायरपर्यंत पोहोचला. अश्विन दूर असून तो डेंजर झोनमध्ये जात नसल्याचे रहाणेने सांगितले. यानंतर देखील अश्विनने अशीच गोलंदाजी सुरू ठेवली होती.


हे ही वाचा: http://IND vs NZ Test series : पहिल्या सत्रातच न्यूझीलंडचे जोरदार कमबॅक; भारताचा निम्मा संघ माघारी

- Advertisement -

 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -