घरमहाराष्ट्रपुण्यात प्लास्टिकवर धडक कारवाई; कोट्यवधी रुपयांचा माल जप्त

पुण्यात प्लास्टिकवर धडक कारवाई; कोट्यवधी रुपयांचा माल जप्त

Subscribe

पुण्यातील खराबवाडी येथील एका गोडाऊनमध्ये प्लास्टिकवर धडक कारवाई करत कोट्यवधी रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

राज्यात प्लास्टिक बंदी होऊन सुद्धा प्लास्टिकचा वापर सर्रास होताना पहायला मिळत आहे. असं असताना देखील चाकण औद्योगिक क्षेत्रातील खराबवाडी येथील आगरवाल पॅकेजिंग कंपनी आणि कुरुळी गावच्या हद्दीतील मिताली पॅकेजिंग प्रा.लिमिटेड अशा दोन ठिकाणच्या कंपन्यांवर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी जाऊन छापा टाकून धडक कारवाई करत महसूल यंत्रणेकडून कच्चा आणि पक्का अशी अंदाजे चार मोठी गोडाऊन भरून कोट्यवधी रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

अशी केली कारवाई

चाकण-तळेगाव रस्त्यावरून दुपारी तीनच्या सुमारास जात असताना खराबवाडी गावच्या हद्दीत एक टेम्पो प्लॅस्टिक घेऊन जात असताना त्या टेम्पो चालकाला हटकले. त्याने हा माल एका कंपनीतून आणला असून तो आगरवाल पॅकेजिंग कंपनीत नेत असल्याचे सांगितले. त्यानंतर या कारवाईला सुरुवात करण्यात आली. अखेर कंपनीत जाऊन धाड मारून ही कारवाई केली गेली. त्यावेळी याठिकाणी प्लॅास्टिक उत्पादन होत असल्याचे आढळून आले. या कंपनीत कच्चा आणि पक्का असा अंदाजे चार मोठी गोडाऊन भरून माल असून हा माल कोट्यवधी रुपयांचा असल्याचे समोर आले आहे. मात्र, कंपनीचे अधिकारी हे उत्पादन ५० मायक्रोनच्या पुढे आहे, असे सांगत आहेत. दरम्यान खराबवाडी येथील आगरवाल पॅकेजिंग ही कंपनी लोखंडी हौद उत्पादन करतात. त्याचप्रमाणे प्लास्टिक उत्पादन आणि सॅनिटरी नॅपकिन देखील या कंपनीत बनवले जाते.

- Advertisement -

पर्यावरण मंत्रीच प्लास्टिकवर कारवाई करतात हे कळताच. महसूल यंत्रणेकडून कच्चा आणि पक्का अशी अंदाजे चार मोठी गोडाऊन भरून कोट्यवधी रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.  – रामदास कदम, पर्यावरणमंत्री

वाचा  – मंदिरांमध्ये प्लॅस्टिक सापडल्यास मंदिरांवर कारवाई होणार – रामदास कदम

- Advertisement -

वाचा – पीएमसी परिसरातील दुकानदारांवर कारवाई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -