घरमहाराष्ट्रमाझ्यासोबत नमाज पढायला नियमित यायचे, चैत्यभूमीवरील विरोधानंतर मलिकांचा वानखेडेंवर निशाणा

माझ्यासोबत नमाज पढायला नियमित यायचे, चैत्यभूमीवरील विरोधानंतर मलिकांचा वानखेडेंवर निशाणा

Subscribe

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे काही वेळापूर्वी दादर चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी दाखल झाले होते. यावेळी वानखेडे महामानवाला अभिवादन करुन बाहेर पडत असताना काही लोकांनी वानखेडेंविरोधात घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली. यामुळे समीर वानखेडे समर्थक आणि विरोधकांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचे पाहायला मिळाले.

याचदरम्यान राज्याचे अल्पसंख्याक विकास कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिकही चैत्यभूमी परिसरात दाखल झाले होते. यावेळी समीर वानखेडेंविरोधात चैत्यभूमी परिसरात जोरदार घोषणाबाजी सुरु होती.
यावेळी काही अनुयांनी एनसीबीचे विभागीय आयुक्त समीर वानखेडेंच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादनाला विरोध दर्शवला. वानखेडेंवर घेण्यात आलेल्या या आक्षेपावर मंत्री नवाब मलिका यांनी चांगलाच टोला लागावला.

- Advertisement -

यावर बोलताना मलिक म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. अभिवादन करणारा व्यक्ती कोणत्याही समाजाचा, जातीचाच असायला हवा, असा समज चुकीचा आहे. मला वाटतेय आम्ही दरवर्षी इथे येतोय. पण काही लोकांनी या वर्षापासून नव्याने यायला सुरुवात केली हे छान आहे. नुकताच जय भीम नावाचा एक पिक्चर आला आहे. त्या सिनेमात जयभीय हे घोषवाक्य नाही. मात्र या सिनेमात तळागाळातील समाजाचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. त्याप्रमाणेच मी जो संघर्ष मी सुरू केलाय, त्याचा जयभीम इम्पॅक्ट आता सुरू झाला आहे. त्यामुळे लोक अभिवादन करायला यायला लागले आहे. मात्र समीर वानखेडे हे कधी चैत्यभूमीवर इतक्या वर्षात अभिवादनाकरता आलेत हे मला माहित नाही, मात्र ते माझ्यासोबत नमाज पढायला नियमितपणे यायचे हे माहिती आहे,” असं मलिक म्हणाले.

तसेच भीमशक्ती रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष अनिल दगडू कांबळे यांनी “समीर वानखेडे यांना चैत्यभूमीवर येण्याचा नैतिक अधिकार नाही.” असं म्हणत विरोध दर्शवला.

- Advertisement -

भीम आर्मीचे दादर स्टेशनबाहेर आंदोलन

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी भीम आर्मीचं दादर स्टेशनसमोर आंदोलन सुरु आहे. या आंदोलनातून भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी दादर स्टेशनला बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची मागणी केली आहे. यावेळी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु होती. या संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दादर स्टेशन परिसरात मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला आहे. या पोलीस बळाच्या मदतीने आंदोलन कर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करण्यात आला.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -