घरताज्या घडामोडीGas Crisis in Pakistan: पाकिस्तानमध्ये घरगुती गॅसचा तुटवडा

Gas Crisis in Pakistan: पाकिस्तानमध्ये घरगुती गॅसचा तुटवडा

Subscribe

पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी मंगळवारी देशात गॅसचे संकट येणार असल्याचा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, ‘संसाधनात वेगाने घट होत आहे आणि येणाऱ्या काही वर्षात पाकिस्तानमध्ये कोणताही गॅस नसेल.’ मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन मंत्री फवाद यांनी घरगुती गॅस कमी असल्याची चिंता जाहीर केली. गेल्या दोन वर्षांपासून देशात प्रत्येक वर्षाला ९ टक्के गॅसमध्ये कमी होत आहे, असी माहिती फवाद यांनी दिली.

पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणाले की, मोठ्या शहरांमध्ये २३ टक्के लोकांना सवलतीच्या दरात घरगुती गॅस उपलब्ध आहे आणि देशातील इतर भागातील ७८ टक्के लोकं येथून वाहून नेत आहेत, जे एलपीजी, कोळसा आणि इतर साधनांवर अवलंबून आहेत.

- Advertisement -

दरम्यान मोठ्या शहरात स्वस्त दरात गॅस घेणाऱ्या लोकांनी आता आपल्या या सवयमध्ये बदल केले पाहिजे. कारण जास्त दिवस असे सुरू राहणार नाही. आता सर्वांना समान पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सरकारला आपल्या गॅस प्रणालीची पुनर्रचना करावी लागेल, अशी माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी दिली आहे.

काही माध्यमाच्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या भंडारमध्ये गॅस तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाने पेट्रोलियम डिविजनला लघु, मध्यम आणि दीर्घकालीन योजना तयार करण्याचे आदेश दिले आहे. तर फेडरल मंत्रिमंडळाने पेट्रोलियम डिविजनला गॅस भंडारमध्ये कमी दर का आहे? याबाबत माहित करून घेण्याचे आदेश दिले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Parker Solar Probe : नासाच्या अंतराळ यानाने पहिल्यांदाच केला सूर्याला स्पर्श


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -