घरमहाराष्ट्र...तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सहआरोपी करण्याची मागणी करू, राणे प्रकरणावरून फडणवीसांचा हल्ला

…तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सहआरोपी करण्याची मागणी करू, राणे प्रकरणावरून फडणवीसांचा हल्ला

Subscribe

ट्विट करत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय. सिंधुदुर्ग पोलिसांनी कायदा पाळायचाच नाही, असे ठरवलेले दिसते! CRPC 160 ची नोटीस देणारे पोलीस जाणीवपूर्वक हे विसरले की 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीला पोलीस स्टेशनमध्ये साक्षीसाठी बोलविताच येत नाही. त्यांची साक्ष घरी जाऊनच घ्यावी लागते, असंही देवेंद्र फडणवीसांनी अधोरेखित केलं आहे.

मुंबईः सिंधुदुर्गात संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार आहे. त्यामुळे ते नॉट रिचेबल आहेत. दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत नितेश राणे कुठे आहेत हे सांगायला मूर्ख आहे का? असे वक्तव्य केले होते. त्यावरूनच कणकवली पोलिसांनी आता नारायण राणेंनाही नोटीस पाठवली. या प्रकरणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केलाय.

ट्विट करत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय. सिंधुदुर्ग पोलिसांनी कायदा पाळायचाच नाही, असे ठरवलेले दिसते! CRPC 160 ची नोटीस देणारे पोलीस जाणीवपूर्वक हे विसरले की 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीला पोलीस स्टेशनमध्ये साक्षीसाठी बोलविताच येत नाही. त्यांची साक्ष घरी जाऊनच घ्यावी लागते, असंही देवेंद्र फडणवीसांनी अधोरेखित केलं आहे.

- Advertisement -

केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांना नोटीस देऊन ठाण्यात साक्षीसाठी बोलावणे हा कायदेशीर अपराध आहे. त्यामुळे आता त्या पोलीस अधिकाऱ्यांवर IPC 166A अंतर्गत एफआयआर नोंदविला जावा, अशी आमची मागणी आहे. आणि असे न केल्यास भाजपा CRPC 156(3) अंतर्गत खटला दाखल करेल. तसेच हे जर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशाने केले असेल तर त्यांच्यावर सुद्धा IPC 34 अन्वये सहआरोपी बनविण्याची मागणी भाजपा करेल, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेय.


दुसरीकडे नारायण राणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत नितेश राणे कुठे आहेत, असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी हे सांगायला आम्ही मूर्ख आहोत का, असे उत्तर दिले होते. ते कुठे आहेत हे मला माहीत असेल तरी मी तुम्हाला का सांगावे? असा प्रतिप्रश्न नारायण राणे यांनी पत्रकारांना उत्तर देताना केला होता. त्याच अनुषंगाने पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे. या नोटीसने राणे यांची अडचण वाढली आहे.

- Advertisement -

राणेंनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी नोटीस बजावली असावी – गृहराज्यमंत्री

गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी राणेंना पाठवलेल्या नोटीसवर प्रतिक्रिया देताना माझ्याकडे अधिकृत माहिती नाही, असे म्हटले. संबंधित तपास अधिकार्‍यांनी नोटीस दिली असेल तर तो तपासाचा भाग असू शकतो. नारायण राणे यांनी केलेले वक्तव्य सर्वांनीच ऐकले आहे. मला माहिती असले तरी नितेश राणे कुठे आहेत हे कशाला सांगू? असे नारायण राणे म्हणाले होते. त्याबाबत राणेंना नोटीस पाठवली असू शकते, असे शंभूराज देसाई म्हणाले.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -