घरताज्या घडामोडीMPSC Exam: 2021च्या राज्यसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर, 'या' दिवशी...

MPSC Exam: 2021च्या राज्यसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर, ‘या’ दिवशी होणार परीक्षा

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक उमेदवारांना परीक्षा देता आल्या नाहीत त्यामुळे वयाधिक उमेदवारांना परीक्षा देण्यासाठी पुन्हा एक संधी देण्यात आली त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC Exam) 2 जानेवारी रोजी होणारी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 पु़ढे ढकलण्यात आली होती. मात्र या परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक आता जाहीर करण्यात आले आहे. एमपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर उमेदवारांना हे वेळापत्रक पाहता येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक उमेदवारांना परीक्षा देता आल्या नाहीत त्यामुळे वयाधिक उमेदवारांना परीक्षा देण्यासाठी पुन्हा एक संधी देण्यात आली त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र सुधारित वेळापत्रक आता जाहीर करण्यात आले आहे.

2 जानेवारीला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 ही आता 23 जानेवारी 2022 रोजी होणार आहे. तर महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2020 संयुक्त पेपर क्रमांक1 29 जानेवारी 2022 ला होणार आहे. ही परीक्षा आधीच्या वेळापत्रकानुसार, 22 जानेवारीला होणार होती. त्याचप्रमाणे महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2020 पेपर क्रमांक 2, पोलीस उपनिरीक्षक ही परीक्षा आता 30 जानेवारी 2022ला होणार आहे. याआधी ही परीक्षा 29 जानेवारीला होणार होती.

- Advertisement -

 

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या उपाययोजना लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगाने लोकसेवा आयोगाकडून आढावा घेण्यात येणार आहे. त्यासंबंधीची माहिती लवकरच लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येईल आणि त्यासाठी उमदेवारांनी वेळोवेळी वेबसाइट चेक करत रहावे, असे प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आले आहे.

या संवर्गातील पदांसाठी होणार मेगाभरती

सार्वजनिक आरोग्य विभाग (936), कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग (924), उद्योग उर्जा व कामगार विभाग (199), अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (62), पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग (16), सामान्य प्रशासन विभाग (1057), मराठी भाषा विभाग (21), आदिवासी विकास विभाग (7), बृहन्मुंबई महापालिका (21), बांधकाम विभाग (13), पर्यावरण विभाग (3), गृह विभाग (1159), वित्त विभाग (321), वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग (1572), उच्च व तंत्रशिक्षण (35), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग (105), सहकार, पणन व वस्त्रोद्योग (32), कौशल्य विकास व उद्योजकता (171), महसूल व वनविभाग (104) यांसह ग्रामविकास, नगरविकास, जलसंपदा, विधी व न्याय व नियोजन विभाग या संवर्गातील पदांसाठी भरती होणार आहे.


हेही वाचा – एमपीएससीद्वारे वर्षभरात ७,५६० जागांची मेगाभरती

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -