घरअर्थजगतSovereign Gold Bond: आजपासून स्वस्त सोने खरेदीची सुवर्णसंधी, पटापट लाभ घ्या...

Sovereign Gold Bond: आजपासून स्वस्त सोने खरेदीची सुवर्णसंधी, पटापट लाभ घ्या…

Subscribe

सरकारने आठव्या सिरीजच्या इश्यूच्या किमतीत नवव्या सिरीजमध्ये प्रति ग्रॅम 5 रुपयांनी कपात केली. आजपासून सुरू होणाऱ्या आठव्या मालिकेसाठी 4791 रुपये प्रति ग्रॅम आणि नवव्या मालिकेसाठी 4786 रुपये इश्यूची किंमत निश्चित करण्यात आली.

नवी दिल्लीः Sovereign Gold Bond: ज्यांना आजपासून सोने खरेदी करायचे आहे, त्यांच्यासाठी सुवर्णसंधी आहे. सॉवरेन गोल्ड बाँड योजनेचा नववा टप्पा Sovereign Gold Bond scheme 2021-22 (Series IX) आजपासून सुरू झालीय. या योजनेअंतर्गत आज म्हणजेच 10 जानेवारी ते 14 जानेवारीपर्यंत तुम्ही स्वस्तात सोने खरेदी करू शकता.

सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये सोन्याची किंमत किती?

RBI ने 2021-22 च्या नवव्या मालिकेतील सॉवरेन गोल्ड बाँडसाठी प्रति ग्रॅम 4786 रुपये इश्यू किंमत निश्चित केलीय. RBI ने या नवव्या टप्प्यासाठी सोन्याची किंमत 4786 रुपये प्रति गॅम हा मागील सीरिजपेक्षा कमी दराने निश्चित केलीय.

- Advertisement -

नवव्या सीरिजमध्ये किंमत कमी केली

सरकारने आठव्या सिरीजच्या इश्यूच्या किमतीत नवव्या सिरीजमध्ये प्रति ग्रॅम 5 रुपयांनी कपात केली. आजपासून सुरू होणाऱ्या आठव्या मालिकेसाठी 4791 रुपये प्रति ग्रॅम आणि नवव्या मालिकेसाठी 4786 रुपये इश्यूची किंमत निश्चित करण्यात आली.

ऑनलाईन खरेदी केल्यास स्वस्त मिळेल

तुम्ही Sovereign Gold Bond मध्ये ऑनलाईन किंवा डिजिटल पद्धतीने सोने खरेदी केल्यास त्यावर तुम्हाला 50 रुपये अधिक सूट मिळू शकते. म्हणजेच 4736 रुपये प्रति ग्रॅम या दराने तुम्ही ऑनलाईन सोने खरेदी करू शकता.

- Advertisement -

ऑनलाईन गुंतवणूक कशी करावी?

एनएसई (नॅशनल स्टॉक एक्स्चेंज) वर सोन्याच्या रोख्यांची युनिट्स खरेदी करा आणि तुमच्या डीमॅट खात्याशी जोडलेल्या खात्यातून त्याच्या मूल्याइतकी रक्कम वजा केली जाते.

सॉवरेन गोल्ड बाँड योजनेची अट

याचा लॉक-इन कालावधी 5 वर्षांचा असतो आणि 8 वर्षांनी परिपक्व होतो. जर तुम्हाला ते 5 वर्षांनंतरच विकायचे असेल तर तुम्हाला दीर्घकालीन भांडवली नफा करानुसार 20.80 टक्के शुल्क भरावे लागेल. जर तुम्ही 8 वर्षे धारण केले आणि बॉण्ड्स मॅच्युअर झाले, तर तुम्हाला ते विकून कमावलेल्या नफ्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही.

तुम्ही त्यात गुंतवणूक कशी करू शकता?

RBI ने बँक शाखा, पोस्ट ऑफिस, स्टॉक एक्सचेंज आणि स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SHCIL) मार्फत गुंतवणूक करण्याचा पर्याय दिलाय. तुम्हाला ऑफलाइन खरेदी करायची असेल, तर तुम्ही या ठिकाणी जाऊन गुंतवणूक करू शकता.

सॉवरेन गोल्ड बाँडची खासियत काय?

सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्य म्हणजे सोने स्वस्तात उपलब्ध असताना गुंतवलेल्या रकमेवर 2.5 टक्के निश्चित परतावा हमखास असतो, जो दर सहामाहीत म्हणजेच 6 महिन्यांनी तुमच्या खात्यात येतो. स्लॅबनुसार तो करपात्र आहे. याचा आणखी एक फायदा असा आहे की, तुम्ही एका आर्थिक वर्षात 1 ग्रॅम ते 4 किलो सोन्याच्या किमतीचे सोने रोखे खरेदी करू शकता. हे जीएसटी आणि सोन्याच्या सामान्य खरेदीसारखे शुल्क आकारत नाही. सॉवरेन गोल्ड बाँडदेखील स्टॉक एक्स्चेंजवर सहजपणे विकले जाऊ शकतात. हे रोखे भौतिक सोन्याच्या जागी ठेवणे अधिक सुरक्षित पर्याय प्रदान करतात.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -