‘पायरेट्स ऑफ द कॅरिबिअन’ या चित्रपटातील प्रसिद्ध झालेली जॅक स्पॅरो याच्या भूमिकेत आता अभिनेता जॉनी डेप दिसणार नसल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तवाहिनीने प्रकाशित केले आहे. जॅक स्पॅरोच्या भूमिकेतून जॉनी ला वगळण्यात आले आहे. त्यामुळे आता जॉनीच्या फॅन्समध्ये शोककळा पसरली आहे. जॉनीनंतर पायरेट्स ऑफ द कॅरिबिअन कोणासाठी बघणार असा सवाल त्याच्या पॅन्सकडून करण्यात आली. मागील १५ वर्षांपासून जॉनी डेपने ‘पायरेट्स ऑफ द कॅरिबिअन’मध्ये मुख्य भूमिका केली. ५५ वर्षीय जॉनी ने केलेली कॅप्टन जॅक स्पॅरोची भूमिका जिवंत केली आहे. आर्थिक आणि खाजगी कारणामुळे डिझनीला हा निर्णय घ्यावा लागला असल्याचे सांगण्यात आले. मात्रवर जॉनीने अद्याप कोणतेही भाष्य केले नाही.
“मला असे वाटते जॉनी मुळे चित्रपट भरपूर चालला. त्याने स्वबळावर ही भूमिका जिवंत केली. आता जॅक स्पॅरोची भूमिका ही प्रसिद्ध झाली आहे. जगप्रसिद्ध असल्यामुळे सर्व लहान मुलांमध्ये जॉनी प्रसिद्ध आहेत.”- पटकथा लेखक स्टुअर्ट बीटी
पायरट्स ऑफ द कॅरिबियन: द कर्स ऑफ द ब्लॅक पर्ल (२००३),
पायरट्स ऑफ द कॅरिबियन: डेड मॅन चेस्ट (२००६),
पायरट्स ऑफ द कॅरिबियन: अॅटल वर्ल्ड एंड (२००७),
पायरट्स ऑफ द कॅरिबियन: ऑन स्ट्रॅन्जर टायड्स (२०११),
पायरट्स ऑफ द कॅरिबियन: डेड मेन टेल टेल नो टेल्स (२०१७)
या चित्रपटांमध्ये जॉनीने मुख्य भूमिका केली आहे. त्याचे सर्व चित्रपट जगभरात गाजले होते.