घरताज्या घडामोडीSaina nehwal : साउथ अ‍ॅक्टर सिद्धार्थच्या 'त्या' माफीनाम्यावर सायना नेहवाल म्हणाली...

Saina nehwal : साउथ अ‍ॅक्टर सिद्धार्थच्या ‘त्या’ माफीनाम्यावर सायना नेहवाल म्हणाली…

Subscribe

ट्विटमुळे अ‍ॅक्टर सिद्धार्थच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आली. मात्र काही काळानंतर अभिनेता सिद्धार्थने सायना नेहवालची माफी मागितली. सिद्धार्थने त्याच्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये सायना नेहवालची माफी मागत एक पत्र शेअर केले आहे. साउथ अ‍ॅक्टर सिद्धार्थच्या माफीनाम्यावर आता सायना नेहवाल व्यक्त झाली आहे.

साऊथचा स्टार म्हणून ओळख असणारा अभिनेता सिद्धार्थ दोन दिवस अगोदर केलेल्या ट्वीटवरुन वादाच्या कचाट्यात अडकला आहे. त्याने बॅडमिंटन स्टार आणि भाजपच्या नेत्या सायना नेहवालबद्दल एक आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. ही टिप्पणी राष्ट्रीय महिला आयोगापर्यंत पोहोचली. या महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी या प्रकरणावर म्हटले की, सिद्धार्थ नेहमीच असे वक्तव्य करुन महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवत असतो. या ट्विटमुळे अ‍ॅक्टर सिद्धार्थच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आली. मात्र काही काळानंतर अभिनेता सिद्धार्थने सायना नेहवालची माफी मागितली. सिद्धार्थने त्याच्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये सायना नेहवालची माफी मागत एक पत्र शेअर केले आहे. साउथ अ‍ॅक्टर सिद्धार्थच्या माफीनाम्यावर आता सायना नेहवाल व्यक्त झाली आहे.

- Advertisement -

सिद्धार्थने हा माफीनाफा त्याच्या अकाउंटवर शेअर केला असून. काही दिवसांपूर्वी तुमच्या ट्विटला उत्तर देताना लिहिलेल्या विनोदाबद्दल मी क्षमस्व आहे. जर मी केलेला विनोद कोणालाही समजला नसेल तर, तो विनोद चांगली गोष्ट नाही. प्रथम मी केलेल्या विनोदाबाबत सॉरी.., मला माहित आहे की या सर्व गोष्टीतील राग विसरुन तुम्ही हे पत्र स्वीकाराल. तू माझ्यासाठी नेहमीच चॅम्पियन राहशील. याशिवाय मी जो विनोद केला यातून तुमच्यावर स्त्री म्हणून टिप्पणी करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता, असेही त्याने म्हटले आहे.

सिद्धार्थच्या माफीनाम्यावर सायना म्हणाली…

सिद्धार्थने माफी मागितली त्याचा आनंद आहे. कारण त्याने जे वक्तव्य केले होते त्यात तो एका महिलेबद्दल बोलला होता. कुठल्याही महिलेला अशा प्रकारे टार्गेट करणे,ही चुकीची बाब आहे. परंतु ठीक आहे,जे झाले त्या गोष्टीचा मी फार विचार करत नाही,असे सायना नेहवालने म्हटले आहे.

- Advertisement -

नक्की काय आहे प्रकरण ?

5 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेमध्ये त्रुटी झाल्या. पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक झाल्याचे समजल्यानंतर सायना नेहवालने एक ट्विट केले होते.ज्या देशात पंतप्रधानांच्याच सुरक्षेशी तडजोड होत असेल, तर कुठलाही देश आपण सुरक्षित आहोत, असा दावा करु शकत नाही. मी कठोर शब्दात या घटनेचा निषेध करते” असे सायनाने तिच्या टि्वटमध्ये म्हटले होते. सिद्धार्थने सायनाच्या या टि्वटला लैंगिकअंगाने जाणारे आक्षेपार्ह रिप्लाय देत रिट्विट केले. त्यामुळे त्याच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आली होती.


हेही वाचा – Nilu Phule : हिंदी बायोपिकमधून उलघडणार अभिनेते निळू फुले यांचे आयुष्य


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -