घरमहाराष्ट्रRepublic Day 2022 : महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारलेली नाही; सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे...

Republic Day 2022 : महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारलेली नाही; सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे स्पष्टीकरण

Subscribe

याबाबत वेळोवेळी संरक्षण मंत्रालयाच्या सूचनेनुसार बैठका आयोजित होऊन महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाची एकूण 12 राज्यांसमवेत निवड अंतिम करण्यात आलीय. सद्यस्थितीत राष्ट्रीय रंगशाळा, नवी दिल्ली येथे संरक्षण मंत्रालयाच्या देखरेखीखाली चित्ररथाची बांधणी सुरू असून, सदरील कामकाज हे अंतिम टप्प्यात आहे.

मुंबई : प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाला परवानगी नाकारलेली नसल्याचे स्पष्टीकरण सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केलेय. प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथे होत असलेल्या संचलनात महाराष्ट्र राज्याने सादर केलेल्या विविध विषयांमधून या वर्षी ‘महाराष्ट्राची जैवविविधता व मानके‘ या विषयाची केंद्र शासनाकडून निवड करण्यात आलीय.

याबाबत वेळोवेळी संरक्षण मंत्रालयाच्या सूचनेनुसार बैठका आयोजित होऊन महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाची एकूण 12 राज्यांसमवेत निवड अंतिम करण्यात आलीय. सद्यस्थितीत राष्ट्रीय रंगशाळा, नवी दिल्ली येथे संरक्षण मंत्रालयाच्या देखरेखीखाली चित्ररथाची बांधणी सुरू असून, सदरील कामकाज हे अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारल्याबाबत कोणतीही सूचना संरक्षण मंत्रालयाकडून प्राप्त झालेली नाही, असंही सांस्कृतिक कार्य संचालनालयानं सांगितलंय.

- Advertisement -

विशेष म्हणजे काही तासांपूर्वीच देशाच्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावरील संचलनात यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथाला केंद्राने परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली होती. 26 जानेवारीला राजपथावर होणाऱ्या संचलनात दरवर्षी देशातील प्रत्येक राज्याच्या संस्कृतीचे प्रतिनिधीत्व करणारे चित्ररथ सहभागी होत असतात. प्रत्येक राज्यांच्या चित्ररथांना दरवर्षी ठराविक निकषांच्या आधारे संधी दिली जाते. त्यानुसार महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा चित्ररथ यंदा राजपथावर पाहायला मिळेल, अशी अनेकांना अपेक्षा होती. परंतु केंद्राने परवानगी नाकारल्याने यावर पाणी फेरले आहे.

यंदा महाराष्ट्रातील जैविविधतेची मानके या विषयावरील चित्ररथ पाहायला मिळणार होता. मात्र महाराष्ट्रातील चित्ररथाबरोबर पश्चिम बंगाल, केरळ आणि बिहारच्या चित्रपथाला केंद्राने परवानगी नाकारल्याची माहिती मिळतेय. सुरक्षेच्या कारणास्तव ही परवानगी नाकारल्याचे केंद्रानं स्पष्ट केलेय. मात्र केंद्राच्या या निर्णयावर आता विरोधी पक्षांकडून जोरदार टीका केली जात आहे. केंद्र सरकारने भाजपाची सत्ता नसलेल्या राज्यांच्या चित्ररथाची परवानगी नाकारल्याचा आरोप शिवसेनेने केलाय. तर इतर पक्षांकडूनही सरकारच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली जातेय.

- Advertisement -

————————————————
हेही वाचा – Republic Day 2022 : प्रजासत्ताक दिनी राजपथावर यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही, केंद्राने नाकारली परवानगी

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -