घरताज्या घडामोडीCID फेम अभिनेते शिवाजी साटम यांना काम मिळेना! म्हणाले घरी राहून थकलोय

CID फेम अभिनेते शिवाजी साटम यांना काम मिळेना! म्हणाले घरी राहून थकलोय

Subscribe

सीआयडीनंतर मला पोलिसांची भूमिका साकारण्यासाठी अनेख ऑफर्स येत आहेत. पण मी का करु? मी एकच भूमिका सतत नाही करू शकत.

CID एसीपी प्रद्युमन म्हणजेच प्रसिद्ध अभिनेते शिवाजी साटम ( Shivaji Satam )  गेल्या अनेक वर्षांपासून सिनेसृष्टीपासून लांब आहेत. सीआडीतील त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले. त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. ‘कुछ तो गडबड हे दया’ त्यांचा डायलॉग आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या शिवाजी साटम यांच्याकडे सध्या काम नाहीये. एका मुलाखती दरम्यान त्यांनी हा खुलासा केला.

काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत शिवाजी साटम म्हणाले होते, ‘सीआयडीनंतर मला पोलिसांची भूमिका साकारण्यासाठी अनेख ऑफर्स येत आहेत. पण मी का करु? मी एकच भूमिका सतत नाही करू शकत. मात्र तरीही टीव्हीवर जर कधी सीआयडी पुन्हा सुरू झाले तर त्यात काम करण्यासाठी पुढे जाणारा मी पहिला नट असेन. परंतु मी ही व्यक्तीरेखा साकारुन कधीच थकलो नाही पण काम नसल्याने सतत घरी राहून फार थकलोय’.

- Advertisement -

पुढे ते म्हणाले, ‘मी मागच्या अनेक वर्षांपासून घरी आहे. माझ्याकडे काम नाही. मी असे नाही म्हणणार की मला कामाच्या ऑफर्स आल्या नाहीत. एक दोन काम मला आली आणि पण मला ती आवडली नाहीत. मी मराठी नाटकातून आलो आहे. त्यामुळे नेहमी तिचं काम केली जी मला मनापासून आवडली. हे माझे दुर्भाग्य आहे की कोणतेही शक्तीशाली चरित्र लिहीले जात नाही. हे दोन्ही बाजूंचे नुकसान आहे. एक अभिनेता म्हणून मला चांगल्या कामाची कमी आहे. आणि प्रेक्षकांना चांगल्या कलाकारांची, त्यात आता आम्ही काहीही करू शकत नाही’.

अभिनेते शिवाजी साटम हे मुळ मराठी कलाकार असून नाटकांमधून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत त्यांनी भारदस्त अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. वास्तव, गुलाम- ए- मुस्तफा, सूर्यवंशम, नायक यासारख्या दर्जेदार 35 हून अधिक हिंदी सिनेमात त्यांनी काम केले आहे. त्याचप्रमाणे मराठी नाटक, सिनेमे तसेच इंग्रजी सिनेमातही काम केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Varun Dhawan: अभिनेता वरुण धवनच्या ड्रायव्हरचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -