घरमहाराष्ट्र'त्या' विधानाप्रकरणी बंडातात्या कराडकरांना पोलिसांनी समन्स देऊन सोडले

‘त्या’ विधानाप्रकरणी बंडातात्या कराडकरांना पोलिसांनी समन्स देऊन सोडले

Subscribe

राज्यातील कोणत्या नेत्यांची मुलं मुले दारू पित नाहीत. सर्व नेत्यांची मुले दारू पितात. काही दारू पिऊन रस्त्यावर पडत असतात याचे पुरावे सुद्धा आहेत. यावेळी सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्या बाबतही बंडातात्या कराडकर यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे.

राज्य सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयामुळे आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपासह अनेकांनी या निर्णयाविरोधात आंदोलन केले. यात ह. भ. प. बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनीही या निर्णयावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांवर टीका केली आणि त्यावरून चांगलाच गदारोळ झाला आहे. नेत्यांची मुलं दारू पितात असं वक्तव्य बंडातात्या यांनी केलं होतं. तसेच खासदार सुप्रिया सुळे दारु पितात असं म्हणत महिला नेत्यांविषयी वादग्रस्त विधान केले. याप्रकरणी ह. भ. प. बंडातात्या कराडकरांविरोधात आज साताऱ्यातील पिंपरजमधील मठात पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच राज्य महिला आयोगानेही त्यांना नोटीस धाडली आहे. त्यामुळे सातारा पोलिसांनी पिंपरजमधील मठात दाखल होत त्यांना ताब्यात घेतले होते, परंतु अनेक तास चौकशी करून बंडातात्या कराडकरांना पोलिसांनी समन्स देऊन सोडले आहे.

बेकायदेशीर आंदोलन करणे, कोरोनाचे नियम न पाळता आंदोलन करणे, मास्क बाबत वेगळी चिथावणी देणे या कलमांखाली बंडातात्या कराडकर यांच्यासह इतर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वादग्रस्त भाषण केल्याचा गुन्हाही सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला होता.

- Advertisement -

कराडकरांचा माफीनामा

बंडातात्या कराडकरांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यानंतर आता बंडातात्या कराडकरांनी माफी मागितली आहे. ” ज्यांनी माझ्याविरोधात आक्षेप नोंदवला आहे त्यांच्यासोबत मी फोनवर बोललो आहे मी. माझ्या वक्तव्यामुळे कोणात्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागायला तयार आहे. माफी मागायला कमीपणा कसला. तुम्ही कशासाठी विषय वाढवता.”

काय म्हणाले होते बंडातात्या कराडकर?

राज्यातील कोणत्या नेत्यांची मुलं मुले दारू पित नाहीत. सर्व नेत्यांची मुले दारू पितात. काही दारू पिऊन रस्त्यावर पडत असतात याचे पुरावे सुद्धा आहेत. यावेळी सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्या बाबतही बंडातात्या कराडकर यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे.


ISIS कमांडर अबू इब्राहिमने अमेरिकेच्या ऑपरेशनमध्ये स्वतःला दिले उडवून, जो बायडेन यांनी पाहिले लाइव्ह


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -