घरठाणेतब्बल १२.२३ कोटींच्या GST चोरीप्रकरणी दाम्पत्याला अटक ; ठाणे CGST ची मोठी...

तब्बल १२.२३ कोटींच्या GST चोरीप्रकरणी दाम्पत्याला अटक ; ठाणे CGST ची मोठी कारवाई

Subscribe

ठाणे जीएसटी आयुक्तालय हद्दीत मुंबई झोनच्या अँटी-एव्हिजन विंगच्या अधिकाऱ्यांनी एका दाम्पत्याला जीएसटी चोरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. त्या दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.तसेच दोषी आढळल्यास या दाम्पत्याला ५ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो. अशी माहिती सूत्रांनी दिली. ठाणे स्थित असलेली M/s Datalink Consultancy ही कंपनी संशयास्पद संस्था म्हणून ओळखली गेली आणि फर्मविरुद्ध चौकशी सुरू करण्यात आली. ही फर्म विविध हाय-प्रोफाइल कंपन्यांना मनुष्यबळ पुरवत असल्याचे तपासात समोर आले.

फर्मने ग्राहकांकडून GST गोळा केला होता परंतु CGST कायदा 2017 च्या तरतुदींचे उल्लंघन करून एका वर्षापेक्षा जास्त काळ सरकारी तिजोरीत GST जमा केला नव्हता. या फर्मचे दोन भागीदार, जे ५० वर्षीय पती आणि ४८ वर्षीय पत्नी आहेत, त्या दाम्पत्याला ३ फेब्रुवारी २०२२ रोजी CGST कायदा 2017 च्या कलम 69 अंतर्गत CGST कायदा 2017 च्या कलम 132 (d) चे उल्लंघन केल्याबद्दल अटक करण्यात आली. तसेच त्यांना ठाणे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात आल्यावर त्या दोघांनाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. आहे.

- Advertisement -

पाच महिन्यात सहा जणांना अटक; 17 कोटींची वसुली

CGST, मुंबई झोनने कर चुकवेगिरी करणार्‍या आणि फसवणूक करणार्‍यांविरुद्ध सुरू केलेल्या चोरीविरोधी मोहिमेचा एक भाग आहे. या मोहिमेदरम्यान गेल्या पाच महिन्यांत CGST ठाणे आयुक्तालयाने 1023 कोटींची करचोरी शोधून काढली, १७ कोटी वसूल करून 6 जणांना अटक केली.

ही मोहीम आणखी तीव्र होणार

CGST विभाग डेटा-मायनिंग, डेटा विश्लेषण आणि नेटवर्क विश्लेषण साधनांचा वापर करून संभाव्य कर चुकवणारे आणि फसवणूक करणार्‍यांना ओळखत आहे. विभाग सेवा क्षेत्र आणि डिजिटल अर्थव्यवस्थेसह अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करत आहे आणि चुकवणाऱ्यांवर लक्ष्य करत आहेत, जे प्रामाणिक आणि आज्ञाधारक करदात्यांसाठी अन्यायकारक स्पर्धा निर्माण करतात. त्यामुळे येत्या काही दिवसांत आणि महिन्यांत विभागाकडून ही चोरीविरोधी मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे अशी माहिती CGST आणि CEX ठाणे आयुक्त राजन चौधरी यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा : Nitesh Rane : नितेश राणेंना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायलयीन कोठडी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -