घरताज्या घडामोडीLata Mangeshkar Passes Away: 'तेरे बिना भी क्या जिना...' म्हणत राऊतांचं ट्विट;...

Lata Mangeshkar Passes Away: ‘तेरे बिना भी क्या जिना…’ म्हणत राऊतांचं ट्विट; रश्मी ठाकरे रुग्णालयात पोहोचल्या

Subscribe

गानकोकिळा, स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज निधन झाले. गेल्या २८ दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज मल्टी ऑर्गन फेलियरमुळे त्यांची प्राणज्योत मालवली. लतादीदींच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भावूक प्रतिक्रिया ट्विटद्वारे व्यक्त केली आहे. ‘तेरे बिना भी क्या जिना.. युग संपले’ असे म्हणत संजय राऊत यांनी ट्वीट केले. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचल्या आहेत. कालही लतादीदींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रश्मी ठाकरे रुग्णालयात पोहोचल्या होत्या.

गेल्या २८ दिवसांपासून लतादीदींवर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. देशासह संपूर्ण जगभरातून त्यांच्या प्रकृतीती सुधारणा होण्यासाठी प्रार्थना केली जात होती. त्यांनी कोरोनावर मात केली होती. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती खालवली आणि त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले. आज सकाळी ८.१२ मिनिटांनी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे निधन झाल्याचे जाहीर करण्यापूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लतादीदींचे फोटो पोस्ट करून शोक व्यक्त केला. पहिल्यांदा संजय राऊत यांनी ‘लता मंगेशकर अमर आहेत’, असे ट्वीट केले. मग त्यांनी ‘सरस्वती’ लिहून लतादीदींचा फोटो शेअर केला आहे. त्यानंतर ‘युग संपले….’,’एक सूर्य, एक चंद्र, एकच लता….’,’तेरे बिना भी क्या जिना..’असे एकापाठोपाठ एक ट्विट संजय राऊतांनी केले.

- Advertisement -

- Advertisement -


हेही वाचा – Lata Mangeshkar Passes Away: ज्येष्ठ गायिका लतादीदी काळाच्या पडद्याआड; ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -