घरठाणेDreams mall fire : ड्रीम्स मॉलमधील भीषण आगीची होणार चौकशी, आगीमागे संशयाचा...

Dreams mall fire : ड्रीम्स मॉलमधील भीषण आगीची होणार चौकशी, आगीमागे संशयाचा धूर

Subscribe

मॉलसमोर आग बघण्यासाठी बघ्यांची गर्दी जमली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी संपूर्ण रात्रभर १५ फायर इंजिन व ११ वॉटर टँकर यांच्या साहाय्याने सदर आग विझविण्याचे काम केले. अखेर पहाटे ४.५६ वाजताच्या सुमारास अग्निशमन दलाला संपूर्ण आग विझवून कुलिंग ऑपरेशन करण्यात यश आले.

भांडुप येथील ड्रीम्स मॉलमध्ये एका वर्षांपूर्वी म्हणजे २५ मार्च रोजी भीषण आग लागून ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतरपासून बंद स्थितीत असलेल्या या मॉलमध्ये शुक्रवारी ४ मार्च रोजी पुन्हा एकदा भीषण आग लागून मॉल जळाल्याने या आगीमागे संशयाचा धूर निघत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, ही भीषण आग का व कशी काय लागली, याचे कारण शोधण्यासाठी अग्निशमन दलाकडून एका आठवड्यात चौकशी करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

भाजपच्या वार्ड क्रमांक ११२ मधील स्थानिक नगरसेविका साक्षी दळवी यांनी, मॉल वर्षभर बंद होता ; मात्र त्या मॉलमध्ये गर्दुल्ले घुसखोरी करून नशा करीत असत, अशी धक्कादायक माहिती दिली आहे. त्यामुळे या आगीबाबत संशय निर्माण झाला आहे. कदाचित त्या गर्दुल्ल्यांमुळेच त्या मॉलला आग लागली नसावी ना ? अशी शंका उपस्थित झाली आहे. आता या आगीमागील खरे कारण हे चौकशीतूनच समोर येणार आहे.

- Advertisement -

प्राप्त महितीनुसार, भांडुप येथील ड्रीम्स मॉलमध्ये २५ मार्च २०२१ रोजी सनराईज रुग्णालयात भीषण आग लागल्याची घटना घडली होती. त्यावेळी ९ जणांचा आगीच्या धुरामुळे दुर्दैवी मृत्यू झाला होता. तसेच, त्या रुग्णालयात दाखल २ कोविड रुग्णांचाही दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर या आगीची चौकशी लावण्यात आली होती. त्यावेळेपासून सदर मॉल हा बंद स्थितीत होता.

मात्र सदर घटनेला एक वर्ष पूर्ण होत असतानाच शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास पुन्हा एकदा याच मॉलमध्ये अचानक आग लागली. ही आग हळूहळू भडकली व अग्निशमन दलाने सदर आग स्तर -४ ची म्हणजे भीषण स्वरूपाची असल्याचे जाहीर केले. यावेळी मॉलसमोर आग बघण्यासाठी बघ्यांची गर्दी जमली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी संपूर्ण रात्रभर १५ फायर इंजिन व ११ वॉटर टँकर यांच्या साहाय्याने सदर आग विझविण्याचे काम केले. अखेर पहाटे ४.५६ वाजताच्या सुमारास अग्निशमन दलाला संपूर्ण आग विझवून कुलिंग ऑपरेशन करण्यात यश आले.

- Advertisement -

बंद मॉलमध्ये गर्दुल्ल्यांचा वावर

स्थानिक नगरसेविका साक्षी दळवी यांनी आगीची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या बंद मॉलमध्ये भीषण आग कशी काय लागली, असा सवाल विचारला असता, नगरसेविका साक्षी दळवी यांनी, सदर मॉलमध्ये काही गर्दुल्ल्यांचा वावर असल्याचे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. त्यामुळे एकप्रकारे मॉलमधील भीषण आगीमुळे आता गर्दुल्ल्यांवर संशय निर्माण झाला आहे.

अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडेंकडून रात्री १२.३० वाजता पाहणी

महापालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी, भांडुप येथील आग लागलेल्या घटनास्थळी रात्री उशिरा १२.३० वाजताच्या सुमारास भेट दिली. यावेळी उपायुक्त क्षिरसागर, सहाय्यक आयुक्त अंबि आदी अधिकारी हे उपस्थित होते. त्यांनी आग कशी काय लागली याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच, पुढील कार्यवाहीबाबत सूचना दिल्या.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -