घरताज्या घडामोडीDisha Salian Case : राणे पिता-पुत्राची ८ तास चौकशी, दिशा सालियन प्रकरणात...

Disha Salian Case : राणे पिता-पुत्राची ८ तास चौकशी, दिशा सालियन प्रकरणात चौकशीसाठी पोलिसांची प्रश्नावली

Subscribe

नारायण राणे आणि नितेश राणे चौकशीसाठी त्यांच्या काररमधून येताच भाजपा आणि राणे समर्थकांनी राणे यांच्या समर्थनार्थ प्रचंड घोषणाबाजी करुन पोलीस ठाण्यात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वातावरण तंग झाले होते.

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात खळबळजनक दावे केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांची शनिवारी मालाडच्या मालवणी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत ८ तास चौकशी सुरु होती. या चौकशीत त्यांना विविध प्रश्न विचारण्यात आले. दिशावर बलात्कार करुन तिची हत्या झाल्याचा आरोप त्यांनी कुठल्या आधारावर केला होता. कोणाच्या सांगण्यावरुन त्यांनी असा गंभीर आरोप केला होता, याबाबत प्रश्न विचारण्यात आले.

दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची मॅनेजर असलेल्या दिशा सालियनचा खून झाल्याचा आणि तिच्यासोबत गैरकृत्य झाल्याचा खळबळजनक दावा नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केला होता. तसेच घटना घडली त्यावेळी एका मंत्र्यांची गाडी तिथे होती, असाही आरोप त्यांनी केला होता. याविरोधात दिशाच्या आई-वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यामुळे मालवणी पोलीस ठाण्यात नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राणे पितापुत्र शनिवारी पोलीस ठाण्यात दाखल झाले. यावेळी पोलीस स्टेशनबाहेर भाजप समर्थकांनी मोठी गर्दी करून जोरदार घोषणाबाजी केली. मालवणी पोलीस ठाण्याबाहेर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

- Advertisement -

कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात

दरम्यान , राणे पिता-पूत्र चौकशीसाठी हजर राहणार असल्याने मालवणी पोलीस ठाणे परिसरात पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. यावेळी भाजपा आणि राणे समर्थकासोबत पोलिसांची शाब्दिक बाचाबाची झाली होती. मालवणीतील एका निवासी इमारतीच्या बाराव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केल्यानंतर दिशा सालियन हिच्याविषयी नारायण राणे आणि त्याचे पूत्र नितेश राणे यांनी अनेकदा आक्षेपार्ह विधान करुन दिशासह सालियन कुटुंबियांची बदनामी केली होती.

दिशाच्या आई वडिलांची लेखी तक्रार

सतत राणे पिता-पूत्रांकडून बदनामीकारक विधान केले जात असल्याने दिशाची आई वासंती सतीश सालियन यांनी मालवणी पोलिसांत लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्यांच्याविरुद्ध मालवणी पोलिसांनी 211, 500, 504, 509, 506 (2), 34 भादवी सहकलम 67 आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक महेंद्र सूर्यवंशी हे करीत आहेत. याच गुन्ह्यांच्या चौकशीसह जबानी नोंदविण्यासाठी नितेश राणे आणि नारायण राणे यांना समन्स बजाविण्यात आले आहे. त्यात नितेश राणे यांना गुरुवारी तीन मार्चला तर नारायण राणे यांना शुक्रवार चार मार्चला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र त्यांच्या वतीने त्यांचे वकिल सतीश मानेशिंदे यांनी एका अर्जाद्वारे ते दोघेही शनिवारी चौकशीसाठी हजर राहतील असे सांगितले होते.

- Advertisement -

राणे यांची अटक अटळ असल्याची भिती

या गुन्ह्यात नारायण राणे आणि नितेश राणे यांची अटक अटळ असल्याची भिती असल्याने शुक्रवारी त्यांच्या वतीने सतीश मानेशिंदे यांनी दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी देताना कोर्टाने मालवणी पोलिसांना राणे पिता-पुत्रांना 10 मार्चपर्यंत अटक करु नये असा आदेश दिले होते. त्यानंतर शनिवारी दुपारी दिड वाजता नारायण राणे आणि नितेश राणे हे मालवणी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाले होते. त्यानंतर या दोघांची पोलिसांनी चौकशी करुन जबानी नोंदवून घेतली. रात्री नऊ वाजेपर्यंत ही चौकशी सुरु होती. यावेळी राणे पिता-पूत्रांसाठी पोलिसांनी एक प्रश्नावली तयार केली होती.

काही तास या दोघांची समोरासमोर तर नंतर स्वतंत्रपणे चौकशी करण्यात आली होती. दिशावर बलात्कार झाला आणि नंतर तिची हत्या झाली हा आरोप त्यांनी कुठल्या आधारावर केला. याबाबत त्यांनी कोणी माहिती दिली. अशा प्रकारे विधान करण्यासाठी त्यांच्यावर कोणाचा दबाब होता का. दिशाच्या आत्महत्येनंतर तिच्याविषयी कोणालाही काहीही जबाब नोंदवायचा असेल किंवा पुरावा सादर करायचा असेल तर त्यांनी पोलिसांना संपर्क साधावा असे आवाहन मालवणी पोलिसांकडून करण्यात आले होते. या आवाहनानंतर राणे पिता-पूत्रांनी मालवणी पोलिसांना का संपर्क साधला नाही. दिशाविषयी त्यांच्याकडे असलेली माहिती का पोलिसांसोबत शेअर केली नाही याबाबत नारायण राणे आणि नितेश राणे यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली.

राणे समर्थकांची प्रचंड घोषणाबाजी

या चौकशीत त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाही. अनेक प्रश्नांना त्यांनी बगल देण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते. चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले. त्यानंतर राणे पिता-पूत्र त्यांच्या कारमधून निघून गेले. दरम्यान राणे पिता-पूत्र चौकशीसाठी हजर राहणार असल्याने तिथे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी सकाळपासून मालवणी पोलीस ठाणे परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. नारायण राणे आणि नितेश राणे चौकशीसाठी त्यांच्या काररमधून येताच भाजपा आणि राणे समर्थकांनी राणे यांच्या समर्थनार्थ प्रचंड घोषणाबाजी करुन पोलीस ठाण्यात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वातावरण तंग झाले होते. या कार्यकर्त्यांना आवर घालण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. यावेळी या कार्यकर्त्यासोबत पोलिसांची शाब्दिक बाचाबाची झाली होती. मात्र काही वेळानंतर पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना बाहेर काढून शांत राहण्याचे आवाहन केले होते.


हेही वाचा : १२ आमदारांच्या नेमणुकांच्या निमित्ताने पवारांचा राज्यपालांना टोला, म्हणाले, राष्ट्रपती, पंतप्रधानांनी…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -