घरक्रीडाIPL 2022 RCB New Captain: आरसीबीकडून नव्या कर्णधाराची घोषणा, विराट कोहलीच्या जागी...

IPL 2022 RCB New Captain: आरसीबीकडून नव्या कर्णधाराची घोषणा, विराट कोहलीच्या जागी ‘हा’ खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

Subscribe

आयपीएल २०२२ चा हंगाम सुरू होण्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने एक मोठी घोषणा केली आहे. आरसीबीने दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज फाफ डू प्लेसिसला कर्णधार म्हणून घोषित केले आहे. टीमने आज शनिवारी कार्यक्रमात घोषणा केली. तसेच नवीन जर्सी देखील लाँन्च करण्यात आली. रनमशीन विराट कोहली या संघाची कमान सांभाळत होता. परंतु गेल्या वर्षी विराटने कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. अशा परिस्थितीत आता आरसीबी फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्त्वाखाली नव्या हंगामात प्रवेश करणार आहे. आरसीबीने मेगा लिलावात फाफ डू प्लेसिसला ७ कोटी रूपयांना विकत घेतले आहे.

- Advertisement -

२०१३ पासून विराट कोहली या संघाचे नेतृत्व करत होता. यंदाच्या मोसमात आरसीबी कोणाला कर्णधार बनवणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. परंतु फाफ डू प्लेसिसला कर्णधार बनवण्यात आलं असून तो पुढील कर्णधारपदाची सूत्रे सांभाळणार आहे. फाफ डु प्लेसिसने आयपीएल कारकिर्दीत एकूण १०० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर २९३५ धावा आहेत. फाफच्या नावावर २२ अर्धशतके आहेत, तर त्याची सरासरी ३४.९४ आहे. फाफ डू प्लेसिससमोर जेतेपद पटकावण्याचे सर्वात मोठे आव्हान असणार आहे.

फॅफ डू प्लेसिस एखाद्या संघाचे नेतृत्व करण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. पहिल्यांदाच तो एमएस धोनीशिवाय खेळताना दिसणार आहे. दरम्यान, विराट कोहलीने एकूण सामने १४० सामने खेळले आहेत. त्यामध्ये ६४ विजय मिळाले असून ६९ सामन्यात पराभव झाला आहे.

- Advertisement -


हेही वाचा : Devendra fadnavis Inquiry : मुंबई पोलीस देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जबाब नोंदवण्यासाठी जाणार


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -