घरमहाराष्ट्र'औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकणारे शिवसेनेचे आदर्श...' MIM च्या युतीच्या ऑफरवर राऊतांची प्रतिक्रिया

‘औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकणारे शिवसेनेचे आदर्श…’ MIM च्या युतीच्या ऑफरवर राऊतांची प्रतिक्रिया

Subscribe

"एमआयएम आणि भाजपची छुपी युती आहे. हे उत्तरप्रदेश, बंगालमध्ये पाहिले. आधीच भाजपसोबत छुपी युती करतायत त्यांच्यासोबत महाविकास आघाडी सरकारचा कुठलाही संबंध येऊ शकत नाहीत.'' असं संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये भाजपकडून फूट पाडण्याची भाषा सुरु असतानाच दुसरीकडे असदुद्दीन ओवैसींच्या एमआयएम पक्षाने महाविकास आघाडी सरकारसोबत युती करण्याची तयारी दाखवली आहे. महाविकास आघाडीसोबत हातमिळवणी करण्याची एमआयएमची तयारी असून शरद पवारांना निरोप पोहचवा अशी विनंती एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपेंना केली आहे. एमआयएमच्या या ऑफरवर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “भाजपा आणि एमआयएमची छुपी युती असल्याचे म्हणत औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकणारे महाराष्ट्राचे आदर्श होऊ शकत नाही किंवा शिवसेनेचे आदर्श होऊ शकत नाही.” असं शब्दात त्यांनी एमआयएमची युतीची ऑफर धुडकावली आहे.

संजय राऊत म्हणाले की, “महाराष्ट्रात तीन पक्षाचचं सरकार आहे. तीन पक्षाचंच सरकार राहिल. चौथा कोण, पाचवा कोण यात तुम्ही का पडताय? शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाराष्ट्रातील हे प्रमुख पक्ष छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचाराने चालणारे पक्ष आहेत. हे आमचे आदर्श आहे. एखाद्या पक्षाचे नेते औरंगजेबाच्या कबरी पुढे जाऊन गुडघे टेकतात आणि औरंगजेब त्यांचा आदर्श आहे, हे महाराष्ट्राचे आदर्श होऊ शकत नाही किंवा शिवसेनेचे आदर्श होऊ शकत नाही. त्यामुळे या अफवा आहेत.”

- Advertisement -

“एमआयएम आणि भाजपची छुपी युती आहे. हे उत्तरप्रदेश, बंगालमध्ये पाहिले. आधीच भाजपसोबत छुपी युती करतायत त्यांच्यासोबत महाविकास आघाडी सरकारचा कुठलाही संबंध येऊ शकत नाहीत.” असं संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

दानवेंच्या 25 आमदारांच्या विधानावर संजय राऊतांची प्रतिक्रिया 

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी काल महाविकास आघाडीचे जवळपास २५ आमदार आमच्या संपर्कात असल्याचे विधान करत राजकीय वर्तुळात एकचं खळबळ उडवून दिली. याच विधानावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलं आहे. “रावसाहेब दानवेंना कदाचित 175 बोलायचे असेल. काल होळी असल्याने दानवे काय बोलले हे त्यांना आज आठवणार नाही.” अशा शब्दात राऊत यांनी दानवेंच्या विधानावर टीकास्त्र डागले आहे.

- Advertisement -

राऊत म्हणाले की, “रावसाहेब दानवे भांग वैगरे पित नाही, माझे चांगले मित्र आहेत. दिल्लीत माझ्या बाजूलाच राहतात. त्यांना भांगेची नशा किंवा इतर कुठली नशा करण्याची आवश्यकता पडली नाही. तरी पण ते कोणत्या नशेमध्ये धुळवडीला बोलले? ते 25 बोलले.. कदाचित त्यांना 175 बोलायचे असेल… की महाविकास आघाडी सरकारमधील 175 आमदार भाजपच्या संपर्कात आहेत… जीभ घसरली असेल… घ्या ना कोणाची वाट पाहताय आणि या फुसकुल्या कोणासाठी सोडताय? उद्या मी म्हटलं की, भाजपचे 50 आमदार संपर्कात आहेत तर? आणि आहेतचं…”


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -