घरताज्या घडामोडीMaharashtra Covid 19 Restrictions : महाराष्ट्रातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले ; मंत्रिमंडळ...

Maharashtra Covid 19 Restrictions : महाराष्ट्रातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले ; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Subscribe

गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध उठवण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच राज्यातील मास्कची सक्ती सुद्धा उठवण्यात आली आहे. राज्यातील निर्बंध उठवल्यामुळे आता गुढीपाडव्याला मिरवणुका आणि शोभायात्रा काढता येणार आहेत.

राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध उठवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. गुढीपाडवा आणि रमजान उत्सव हा साजरा करण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये, यासाठी मास्कचा वापर करण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे.

- Advertisement -

राज्यातील कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्यानंतर आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाल्यानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत गुढी पाडव्याच्या मिरवणूका जोरात काढा, असं म्हटलं आहे.

- Advertisement -

गुढीपाडव्याच्या मिरवणूका जोरात काढा 

आज मंत्रीमंडळात कोरोनाचे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले आहेत. गुढीपाडव्याच्या मिरवणूका जोरात काढा. रमजान उत्साहात साजरा करा आणि बाबासाहेबांच्या मिरवणूका जोरात काढा, अशा प्रकारचं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. राज्यातील सर्व निर्बंध उठवण्यात आलेल आहेत. सर्वांनी आपले सण आनंदात साजरे करावेत. ज्यांना मास्कचा वापर करायचा आहे त्यांनी करावा, नसेल त्यांनी नको, मास्कचा वापर हा ऐच्छिक असल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. जुनं ते मागे सारुन नवीन कार्याचा प्रारंभ करणारा हा दिवस. गेल्या दोन वर्षापासून आपण कोरोनाच्या भयंकर विषाणूचा यशस्वीरित्या मुकाबला केला आणि आज हे सावट दूर होताना दिसते. एक नवीन सुरवात करण्यासाठी म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध गुढीपाडव्यापासून (२ एप्रिल) पूर्णपणे उठवण्यात येत आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घोषित केले. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळाच्या वतीने राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

मात्र कोरोनाचा भविष्यात धोका उद्भवू नये यासाठी नागरिकांनी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. आरोग्याचे नियम पाळून आपली तसेच इतरांची देखील काळजी घ्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. याबाबतीतले सविस्तर आदेश तातडीने देण्याचे निर्देश देखील त्यांनी प्रशासनाला दिले.

गेल्या दोन वर्षापासून राज्यातील डॉक्टर्ससह सर्व फ्रंटलाईन कर्मचारी, एवढेच नव्हे तर सर्व नागरिकांनी कोरोनाशी लढतांना एकमुखाने आणि एकदिलाने राज्य शासनाच्या प्रयत्नांना बळ दिले, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना देखील मन:पूर्वक धन्यवाद दिले. या संपूर्ण काळात राज्यातील विविध जाती-धर्म आणि पंथाच्या नागरिकांनी त्यांच्या सण, उत्सव तसेच समारंभांना देखील मर्यादित ठेवले व संयम पाळला. पोलीस यंत्रणा, पालिका-नगरपालिका, महसूल व ग्रामविकास यंत्रणा आणि एकूणच प्रशासनाने कोरोनाचा दिवस रात्र मुकाबला केला, याविषयी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले तसेच सर्वांचे मनापासून आभार देखील मानले.

महाराष्ट्रातील जनता याचं मोठ्या प्रमाणात स्वागत करेल – जयंत पाटील

येणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रातील जनतेला गुढी उभारून खऱ्या अर्थाने आनंद व्यक्त करण्याची संधी कोरोनामुक्तीमुळे मिळाली आहे. कोरोनाच्या काळात जे काही निर्बंध लादण्यात आले होते. ते उठवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. मला खात्री आहे की, महाराष्ट्रातील जनता याचं मोठ्या प्रमाणात स्वागत करेल. परंतु आपण स्वत: काळजी घेतली पाहीजे आणि आपल्या मर्यादा सांभाळल्या पाहीजेत. इतर बंधनांपासून जरी मुक्ती मिळाली असली तरी आपण आपली काळजी घेतली पाहीजे, असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले.

शाळेमध्ये मास्क बंधनकारक – शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू

राज्य सरकारने घेतलेला निर्णय सर्वांसाठी सारखाच राहणार आहे. मात्र, शाळेत आपण विद्यार्थ्यांसाठी जास्त काळजी घ्यायला हवी. कारण विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची बाधा होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांना शाळेत आणि वर्गात मास्क बंधनकारक असेल, असं शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले.


हेही वाचा : एसटीच्या पुनर्बांधणीसाठी अजित पवारांच्या निर्देशानुसार ३९ कोटी वितरीत


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -