घरमनोरंजनथप्पड प्रकरणानंतर Will Smith ने दिला अ‍ॅकडमीचा राजीनामा

थप्पड प्रकरणानंतर Will Smith ने दिला अ‍ॅकडमीचा राजीनामा

Subscribe

प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता विल स्मिथने 94 व्या ऑस्कर 2022 (oscars 2022) पुरस्कार सोहळ्यात होस्ट क्रिस रॉकच्या कानाखाली मारली होती. हे प्रकरण हॉलीवूड, बॉलिवूडसह जगभरात गाजले. मात्र या प्रकरणामुळे आता मोठा वाद निर्माण झाला आहे. अनेकांनी विल स्मिथचे हे वागणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. यानंतर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुरु करण्यात आली. मात्र कारवाईपूर्वीच विल स्मिथने ऑस्करचे आयोजन करणाऱ्या अकादमीचा राजीनामा दिला आहे. या घटनेमुळे विल स्मिथ खूप दुखावला असून त्याने आपली चूक मान्य केली आहे. दरम्यान राजीनामा दिल्यानंतर पुन्हा एकदा विल स्मिथने माफी देखील मागितली आहे.

“मी अकादमीचा विश्वास दुखावला असल्याचे त्याने निवेदनात म्हटले आहे. बदल घडायला वेळ लागतो आणि माझ्याकडून जी चूक झाली ती सुधारायला, त्यात बदल करायला मी तयार आहे. जेणेकरून माझ्याकडून हिंसेला कधीही प्रोत्साहन दिलं जाणार नाही”, असं स्मिथने माफीनाम्यात म्हटले आहे.

- Advertisement -

विल स्मिथने आपल्या माफीनाम्यात पुढे लिहिले की, “अॅकडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट अँड सायन्सेसच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा देत आहे. यानंतर बोर्डचा जो निर्णय असेल तो मान्य आहे. 94 व्या अॅकडमी अवॉर्डसदरम्यान माझ्याकडून जे काही कृत्य घडलं ते अत्यंत निंदनीय आणि अक्षम्य आहे. ज्या लोकांना माझ्यामुळे त्रास झाला त्यांची लिस्ट मोठी आहे. त्यात क्रिस त्याचे कुटुंब, माझे कुटुंब आणि मित्र परिवार, चाहते यांचा समावेश आहे.”

;

- Advertisement -

स्मिथचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे असे फिल्म अॅकडमीचे अध्यक्ष डेव्हिड रुबिनने स्पष्ट केले आहे. अॅकडमीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने स्मिथविरोधात ही कारवाई करण्यात आली, यासंदर्भातील पुढील बैठक आता 18 एप्रिलच्या आधी होईल.

पुरस्कार सोहळ्यादरम्यान पत्नीची खिल्ली उडवल्याप्रकरणी विल स्मिथने होस्ट आणि प्रेझेंटर ख्रिस रॉकला कानाखाली मारली. विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेट स्मिथ हिला अलोपेसिया नावाचा आजार आहे. या कारणासाठी यामुळे तिच्या डोक्यावर केस नाहीत. यावरून क्रिस रॉकच्या कानशिलात लगावली होती. विल स्मिथ आणि क्रिस रॉकचे यांच्यातील हे थप्पड प्रकरण चांगेलच गाजले. नंतर विल स्मिथने त्याच्या वागणुकीबद्दल माफी मागितली.

यावेळी 94 वा अकादमी पुरस्कार ऑस्कर अवॉर्ड्स 2022 एका खास कारणामुळे चर्चेत आला होता. मॅन इन ब्लॅक फेम विल स्मिथला किंग रिचर्ड या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला, पण यापेक्षाही त्याच्या एका थप्पड घोटाळ्याची चर्चा होत आहे.


Kundali Bhagya फेम धीरज धूपर लवकरचं होणार बाबा; पत्नीसोबतचा रोमँटिक फोटो शेअर करत दिली गुडन्यूज

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -