घरताज्या घडामोडीJharkhand ropeway accident : झारखंडच्या रोप वे हेलिकॉप्टर रेस्क्यू दरम्यान महिला कोसळली

Jharkhand ropeway accident : झारखंडच्या रोप वे हेलिकॉप्टर रेस्क्यू दरम्यान महिला कोसळली

Subscribe

झारखंडच्या देवघर येथील त्रिकुट पर्वत रोप वे दुर्घटनेत सलग तिसऱ्या दिवशी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. या बचावकार्यात एक मोठी दुर्घटना घडली. ट्रॉलीतून महिलेला बाहेर काढताना एका महिला अचानक कोसळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पण महिला सेफ्टी बेल्टने बांधलेली असल्याने मोठा धोका टळला. या घटनेत एक महिलेला सेफ्टी बेल्टमुळे जोरदार झटका बसला. या झटक्यानंतर महिलेची लॅण्डिंग करण्याची वेळआली. पण घटनेत ही महिला खाली पडून जखमी झाली. याआधी सोमवारीही एका तरूणाचा रेस्क्यू ऑपरेशनमध्ये पडून मृत्यू झाला होता. तिसऱ्या दिवशीही सातत्याने रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून आता अवघी काहीच माणसे ट्रॉलीमध्ये शिल्लक राहिली आहेत.

आईटीबीपीच्या जवानांनी हेलिकॉप्टरमधून २५०० फूट उंचीवरून रोप वे मध्ये अडकलेल्या तीन ट्रॉलीतील १३ जणांची सुटका तीन दिवसांमध्ये केली आहे. याठिकाणी हवेचा वेग अधिक असल्याने हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बचावासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये ४६ जणांचे रेस्क्यू करण्यात आले आहे. तर ट्रॉलीत आणखी एक व्यक्ती अडकल्याची माहिती आहे.

- Advertisement -

पहिल्या दिवशी वायुदलाने, आयटीबीपी आणि एनडीआरएफच्या टीमच्या मदतीने १२ तास बचावकार्य केले होते. त्यामध्ये ३३ लोकांना तीन हेलिकॉप्टर आणि दोरखंडाच्या सहाय्याने वाचवण्यात आले. यादरम्यान सेफ्टी बेल्ट तुटल्याने एका व्यक्तीची हेलिकॉप्टरमधून खाली पडून मृत्यू झाला. या घटनेत एकुण तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर १२ जण जखमी झाले. एकुण तीन हेलिकॉप्टरच्या माध्यमातून हे बचावकार्य चालले. त्यामध्ये अधिकाऱ्यांनीही याठिकाणी तळ ठोकला होता. तसेच बचावकार्यानंतर अनेकांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले. काही जणांना आयसीयूमध्येही उपचारासाठी दाखल करण्यात आले.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -