घरमहाराष्ट्रचंद्रकांत पाटलांसाठी राष्ट्रवादीने काढलं हरिद्वारचे थ्री टायर एसीचे तिकीट

चंद्रकांत पाटलांसाठी राष्ट्रवादीने काढलं हरिद्वारचे थ्री टायर एसीचे तिकीट

Subscribe

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासाठी हरिद्वारचे तिकीट बूक केलं आहे. थ्री टायर एसीचे तिकीट बूक केलं आहे. त्यामुळं आता भाजपा कडून याला प्रत्यूत्तर काय मिळतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

“आज चॅलेंज आहे आपलं. ज्याला वाटतं असेल त्यानं कोल्हापूर जिल्ह्यातल्या विधानसभेच्या कोणत्याही मतदारसंघाचा राजीनामा द्यायचा. पोटनिवडणूक लावायची. निवडून नाही आलो ना तर सरळ राजकारण सोडून हिमालयात निघून जाईन”, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज कोल्हापूर उत्तर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या नेत्या कॉग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांनी विजय मिळवला. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासाठी हरिद्वारचे तिकीट बूक केलं आहे. थ्री टायर एसीचे तिकीट बूक केलं आहे. त्यामुळं आता भाजपा कडून याला प्रत्यूत्तर काय मिळतं हे पाहणं महत्वाचं
ठरणार आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजा राजपूरकर यांनी हरिद्वारचे थ्री टायर एसीचे तिकीट काढलं आहे. तसंच, चंद्रकांत पाटील तुम्ही हिमालयात कधी जातायेत असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला. ”मुंबई ते हरिद्वार असं देहरादून ट्रेनचे तिकीट काढलं आहे. तसंच, चंद्रकांत पाटील यांना हिमालयात जाण्याच्या प्रवासात कसलीही अडचण होऊ नये यासाठी हे तिकीट काढलं आहे. चंद्रकांत पाटलांना हे तिकीट कुरिअर करणार आहे”, असं राजा राजपूरकर यांनी म्हटलं, तसंच ”चंद्रकांत पाटलांनी लवकरात लवकर सन्यास घ्यावा” असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.

- Advertisement -

राजा राजपूरकर यांनी 1790 रुपये खर्च करून 20 तारखेचे तिकीट चंद्रकांत पाटलांसाठी काढले आहे. चंद्रकांत पाटील यांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी हे तिकीट काढल्याचं त्यांनी सांगितलं.

कोल्हापूर उत्तर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या नेत्या काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांनी विजय मिळवला. जाधव यांच्या पत्नी जयश्री यांनी जवळपास १९ हजार मतांनी हे यश मिळवलं असून त्यांना ९६ हजार २२६ मतं मिळाली आहेत. तर भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम यांना ७७ हजार ४२६ मतं मिळाली आहेत. या निकालानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांचे काही पोस्टर व्हायरल होत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – आमचे नाना कदम लढले तर फेस आला, मी लढलो तर काय होईल; चंद्रकांत पाटलांचं पुन्हा चॅलेंज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -