घरट्रेंडिंगGraduate Chaiwali : ग्रॅज्युएशननंतर दोन वर्षे नोकरी शोधली, अन् तरुणी बनली 'चहावाली'

Graduate Chaiwali : ग्रॅज्युएशननंतर दोन वर्षे नोकरी शोधली, अन् तरुणी बनली ‘चहावाली’

Subscribe

अर्थशास्त्रात पदवी पूर्ण करणारी तरुणी गेल्या दोन वर्षांपासून नोकरीच्या शोधात होती, मात्र दोन वर्षे प्रयत्न करुनही नोकरी न मिळाल्याने तरुणीने चहाचे दुकान सुरु करण्याचा निर्णय घेतला. या अर्थशास्त्र पदवीधर असलेल्या मुलीने पाटणा येथील महिला कॉलेजबाहेरील एक नाक्यावर चहाचे दुकान सुरु केले आहे. यावर ग्रॅज्युएट प्रियांका गुप्ता म्हणाली की, तिने 2019 मध्ये यूजी ( अंडर ग्रॅज्युएट) केले पण गेल्या 2 वर्षांपासून तिला जॉब मिळू शकला नाही. यावेळी तिने प्रफुल्ल बिलोर याच्याकडून प्रेरणा घेत, देशात अनेक चहावाले आहेत, मग चहावाली का असू शकत नाही? असा विचार केला.

पाटण्यातील महिला कॉलेजबाहेर उघडले चहाचे दुकान

बिहारची राजधानी पाटणा येथे 24 वर्षीय प्रियंका गुप्ताने नोकरी न मिळाल्याने चहाचे दुकान उघडण्याचा निर्णय घेतला. बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेली प्रियंका गुप्ता दोन वर्षांच्या मेहनतीनंतरही बँक स्पर्धा परीक्षेत नापास झाली. यानंतर तिने पाटणा महिला कॉलेजजवळ चहाची टपरी सुरु केली. महात्मा गांधी काशी विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रियंकाने यावर्षी 11 एप्रिलपासून चहा विकण्यास सुरुवात केली. ती तिच्या स्टॉलकडे मोठ्या संख्येने ग्राहकांना आकर्षित करत आहे.

- Advertisement -

प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रियंका म्हणाली, ‘गेल्या दोन वर्षांपासून मी बँक स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे, परंतु संपूर्ण वेळ व्यर्थ गेला. त्यामुळे घरी जाण्याऐवजी पाटण्यात हातगाडीवर चहाची टपरी लावण्याचे ठरवले. यात मला कोणताही संकोच नाही. शहरात माझे स्वतःचे चहाचे दुकान उघडले आणि मी या व्यवसायाकडे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक पाऊल म्हणून पाहतो.

- Advertisement -

MBA चहावाल्याकडून प्रेरणा घेत सुरु केले स्वत:चे चहाचे दुकान

अहमदाबादमध्ये चहाचे दुकान चालवणारा MBA चा विद्यार्थी प्रफुल्ल बिलोरला प्रियंका आपला आदर्श मानते. एमबीए करूनही बिलोर येथे त्याने स्वत:चे चहाचे दुकान सुरू केले आणि आता त्याचा मोठा व्यवसाय आहे. 24 वर्षीय प्रफुल्ल बिलोर ग्राहकांना आपल्या चहाच्या स्टॉलकडे आकर्षित करण्यासाठी ‘पीना ही पडगा’, ‘सोच मत… चालू कर दे बस’ या सारख्या हटले पंचलाईन वापरत आहे. ज्यामुळे आज प्रफुल्लच्या चहाच्या स्टॉलबाहेर मोठ्या संख्येने ग्राहक चहा पिण्यासाठी येतात.


हेही वाचा- अबू सालेमच्या शिक्षेचा कालावधी संपण्याआधीच मुक्तता अशक्य – गृह मंत्रालय

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -