घरताज्या घडामोडीउद्धव ठाकरे आणि माझी पत्नी अमृता यांच्यामध्ये साम्य आहे - देवेंद्र फडणवीस

उद्धव ठाकरे आणि माझी पत्नी अमृता यांच्यामध्ये साम्य आहे – देवेंद्र फडणवीस

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यात सध्या वाकयुद्ध सुरू आहे. उ्द्धव ठाकरे यांच्यावर टिका करण्याची एकही संधी अमृता सोडत नाही. मात्र त्यांच्यातील या वादात आता थेट देवेंद्र फडणवीस यांनी उडी मारली आहे. मुख्यमंत्री आणि अमृता यांच्यातील वाकयु्द्धावर बोलताना देवेंद्र यांनी उद्धव ठाकरे टोमणे मारायचे सोडत नाहीत आणि माझी पत्नी अमृता नको त्या गोष्टींवर बोलणं सोडत नाही, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझी पत्नी अमृता फडणवीस यांच्यामध्ये हे एक साम्य आहे, असे मिश्किल वक्तव्य केले आहे.

अमृता फडणवीस या सोशल मीडियावर सक्रिय असून त्या सातत्याने महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्याना लक्ष्य करत असतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तर कधी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करण्याची एकही संधी अमृता सोडत नाहीत.

- Advertisement -

रविवारी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे चांगले गातात असे मला आदित्यने सांगितले होते. मात्र आजपर्यंत एकच व्यक्ती गाते असे मला वाटत होते अशी खोचक टीका  अमृता यांचे नाव न घेता केली होती.

त्यावर अमृता फडणवीस यांनीही ठाकरेंवर हल्लाबोल केला. मला वाटले होते, अब्जाधीश फक्त आपणच आहात. आता कळले आपल्या बायकोचा भाऊ सु्दधा अब्जाधीशच आहे. असे टि्वट करत अमृता फडणवीसांनी मुख्यमंत्र्यावर पलटवार केला होता. याचपार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांना विचारता त्यांनी उ्द्धव ठाकरे यांच्यावर मिश्किल पण खोचक टोला हाणला. तसेच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री म्हणून उ्द्धव ठाकरेंनी आपली पातळी उच्च ठेवली पाहीजे तसेच ज्यावेळी मुख्यमंत्री जेव्हा एखादे वक्तव्य करतील तेव्हा अमृता यांनीही त्यांना उत्तर देता कामा नये. त्यांनी अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केले पाहीजे. अर्थात काय बोलायचे काय नको हा दोघांचा प्रश्न आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -