घरअर्थजगतआयसीआयसहीत 'या' दोन बँकांनी वाढवले व्याजदर; गृह, वाहन कर्ज महागले

आयसीआयसहीत ‘या’ दोन बँकांनी वाढवले व्याजदर; गृह, वाहन कर्ज महागले

Subscribe

आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी 2 आणि 3 मे रोजी तातडीची बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी रेपो दरात ०.४० टक्क्यांची वाढ करण्याची घोषणा केली  रेपो दर वाढवल्यामुळे बँकांना आरबीआयकडून मिळणारे कर्ज महागले आहे. त्यामुळे याचा भार या बँका आता आपल्या ग्राहकांवर टाकला आहे.

पेट्रोल-डिझेल, खाद्यपदार्थ, एलपीजी, एफएमसीजी उत्पादनांच्या वाढत्या किमतीमुळे हैराण झालेल्या सर्वसामान्यांच्या खांद्यावर आता आणखी कर्जाचा बोजा वाढला आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनीही कर्जे महाग करण्यास सुरुवात केली आहे. आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा आणि आयडीबीआय बँकेने त्यांच्या एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट्समध्ये ( EBLR -External Benchmark Lending Rate) वाढ केली आहे. त्यामुळे या बँकांची गृहकर्ज, वाहन कर्जासह सर्व प्रकारची कर्जे महाग झाली आहेत.  सर्वसामान्यांवर कर्जाच्या ईएमआयचा बोजा वाढणार आहे.

आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी 2 आणि 3 मे रोजी तातडीची बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी रेपो दरात ०.४० टक्क्यांची वाढ करण्याची घोषणा केली  रेपो दर वाढवल्यामुळे बँकांना आरबीआयकडून मिळणारे कर्ज महागले आहे. त्यामुळे याचा भार या बँका आता आपल्या ग्राहकांवर टाकला आहे.

- Advertisement -

बँक ऑफ बडोदाने रेपो-रेट लिंक्ड लेंडिंग रेट (RRLR) मध्ये 0.40 टक्के वाढ केली आहे. या वाढीनंतर बँकेचा व्याजदर 6.90 टक्क्यांवर पोहोचला. नवीन दर 5 मे 2022 पासून लागू झाले आहेत. तर खाजगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेनेही एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट्स 0.40 टक्क्याने वाढवला आहे. बँकेचा हा दर आता 8.10 टक्के झाला आहे. त्यामुळे बँकेच्या ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा महाग कर्ज मिळणार आहे.याशिवाय आयडीबीआय बँकेनेही आपल्या व्याजदरात 0.40 टक्के वाढ केली आहे.

एसबीआयकडूनही व्याजदर वाढ?
या बँकांनंतर देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयनेही कर्ज महाग करण्याचे संकेत दिले आहेत. बँकेच्या 13 मे पूर्वी होणाऱ्या बैठकीत दर वाढवण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. बँक व्याजदरात  0.40 टक्के वाढ करण्याची शक्यता आहे. एसबीआयच्या 13 मे रोजी होणाऱ्या बोर्डाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. वाढलेले दर १ जुलैपासून लागू होतील.

- Advertisement -

EBLR म्हणजे काय?
EBLR हा किमान व्याज दर आहे. या दरानुसार कोणतीही बँक आपल्या ग्राहकांना कर्ज देते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -