घरदेश-विदेशराजीव कुमार देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त, विधी मंत्रालयाची आधिसूचना

राजीव कुमार देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त, विधी मंत्रालयाची आधिसूचना

Subscribe

देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजीव कुमार हे 15 मे रोजी पदभार हाती घेणार आहेत. विधी मंत्रालयाने याबद्दल अधिसूचना काढली आहे. केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी यासंदर्भात ट्वीट केले असून त्यांनी नवनियुक्त मुख्य निवडणूक आयुक्तांचे अभिनंदन केले आहे.

राजीव कुमार यांनी 2020 साली निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यावेळी त्यांची अशोक लवासा यांच्या जागी नियुक्ती झाली होती. . राजीव कुमार हे झारखंड कॅडरचे 1984 बॅचचे सेवानिवृत्त IAS अधिकारी आहेत. ते 2025 मध्ये सेवानिवृत्त होतील. 2024 च्या लोकसभा निवडणुका त्यांच्या नेतृत्वात होणार आहेत.

- Advertisement -

राजीव कुमार यांनी 36 हून अधिक वर्षे शासकीय सेवेत घालवली आहेत. त्यांनी केंद्र आणि बिहार-झारखंड राज्य कॅडरमध्ये विविध मंत्रालयाचे कामकाज सांभाळले आहे. ते 2020 साली केंद्रीय वित्त सचिव म्हणून शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत. यानंतर त्यांची सार्वजनिक उद्यम चयन बोर्ड (PESB)चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -