महेश बाबूपेक्षा ‘हे’ बॉलिवूड स्टार्स घेतात सर्वाधिक मानधन

“बॉलिवूडला मी परवडणारा नाही” असं वादग्रस्त वक्तव्य करणारा महेश बाबू आता चांगलाच चर्चेत आला आहे. मात्र या व्यक्तव्यावर बॉलिवूडमधून अनेकजण टीका करत असल्याचे लक्षात येताच महेश बाबूने त्याच्या वक्तव्यावरून पलटी मारली आहे. खरंतर महेश बाबू एका चित्रपटासाठी ५५ ते ८० करोड पैसे घेतो. मात्र बॉलिवूडमध्ये असे अनेक दिग्गज कलाकार आहेत जे महेश बाबू पेक्षा चार पट जास्त पैसे घेतात.