घरताज्या घडामोडीरात्रंदिवस पैसा पैसा करणाऱ्या भाजप नेत्यांनी हनुमान चालिसा समजून घ्यावी, अमोल मिटकरींचा...

रात्रंदिवस पैसा पैसा करणाऱ्या भाजप नेत्यांनी हनुमान चालिसा समजून घ्यावी, अमोल मिटकरींचा फडणवीसांना टोला

Subscribe

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारच्या उत्तर सभेतून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. हनुमान चालिसा पठण केल्यानंतर फडणवीसांनी ठाकरे सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी हनुमान चालिसाच्या दोन ओळींचा अर्थ सांगताना भ्रष्टाचारावरुन सरकारवर टीका केली. या ठाकरे सरकारला दोन ओळी माहिती आहेत म्हणून ते फक्त त्या दोन ओळींनुसारच काम करत आहेत. ‘राम दुआरे तुम रखवारे, होत न आज्ञा बिनु पैसारे’ अशा या ओळी आहेत. यानुसार महाविकास आघाडीने 24 महिन्यात 53 मालमत्ता तयार केल्या असा घणाघात फडणवीस यांनी केला. यानंतर आता महाविकास आघाडी सरकारकडून फडणवीसांना त्या दोन ओळींचा अर्थ संमजवून सांगण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी अमोल मिटकरी यांनी ट्विट करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना हनुमान चालिसाच्या दोन ओळींचा अर्थ समजवून सांगितला आहे. तसेच त्यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. आज देवेंद्रजी फडणवीस यांच्या आवाजाचा कर्कश भोंगा ऐकला !त्या भोंग्यातुन हनुमान चालीसा मधील चौपाई चा आधार घेत “पैसा” असा उल्लेख आला .रात्रंदिवस पैसा पैसा करणाऱ्या भाजपाच्या ह्या भरीव नेत्यांनी खरा अर्थ अगोदर समजून घ्यावा “रामदुआरे तुम रखवारे ! होत न आज्ञा बिनु पईसारे याचा अर्थ मिटकरी यांनी सांगितला आहे.

- Advertisement -

फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी उत्तर सभेतून हनुमान चालिसा पाठ केला. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टीकांवर प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्र्यांची कालची सभा ही लाफ्टर सभा होती असा टोला फडणवीसांनी लगावला आहे. तसेच कालची कौरवांची सभा झाली आज पांडवची सभा असल्याचेही त्यांनी म्हटले.

‘राम दुआरे तुम रखवारे, होत न आज्ञा बिनु पैसारे’.. म्हणून फक्त 24 महिन्यात 53 मालमत्ता तयार झाली आणि यशवंत जाधव यांनी आपल्या मातोश्रीला 50 लाखांची घड्याळही दिले असा अर्थ फडणवीस यांनी सांगितला होता. यानंतर महाविकास आघाडीकडून फडणवीसांना निशाणा करण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा : धर्मवीर चित्रपटाचा शेवट मुख्यमंत्र्यांनी टाळला, म्हणाले आनंद दिघेंचा मृत्यू…

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -