घरक्राइमआंबे तोडताना विजेचा शॉक लागल्याने सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

आंबे तोडताना विजेचा शॉक लागल्याने सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

Subscribe

झाडावर आंबे तोडण्यासाठी गेलेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअरचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.२४) सकाळी ८ वाजेदरम्यान इंदिरा नगर येथील राजसारथी सोसायटीत घडली. अनिरुद्ध अनिल धुमाळ (वय ३०) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी इंदिरा नगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिरुद्ध धुमाळ आजोबांच्या घरी झाडावरील आंबे तोडण्यासाठी आला होता. तो शिडीच्या सहाय्याने आंब्याच्या झाडावर चढला. झाडावर असताना त्याच्या हातातील लोखंडी पाईपचा स्पर्श झाडाजवळून गेलेल्या उच्चदाबाच्या विद्युत वहिनीला झाल्याने त्यास जोरदार विजेचा धक्का बसला. त्या धक्क्याने तो झाडावरून खाली फेकला गेला. त्यात त्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करुन त्यस मृत घोषित केले. पुढील तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -