घरताज्या घडामोडीSameer Wankhede Transferred : NCB माजी अधिकारी समीर वानखेडेंची दुसऱ्यांदा बदली, DGTS...

Sameer Wankhede Transferred : NCB माजी अधिकारी समीर वानखेडेंची दुसऱ्यांदा बदली, DGTS चेन्नईत पोस्टिंग

Subscribe

दरम्यान आर्यनला क्लीन चिट मिळाल्यानंतर समीर वानखेडे यांची दुसऱ्यांदा बदली करण्यात आली आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडल्यावर वानखेडेंची बदली आयआरएस विभागात करण्यात आली होती.

एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांची दुसऱ्यांदा बदली करण्यात आली आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये मुंबईतील कॉर्डेलिया क्रूझवर केलेल्या छापेमारीमुळे समीर वानखेडे चर्चेच्या केंद्रस्थानी होते. शाहरुख खान पुत्र आर्यन खानला क्रूझवर ड्रग्जसहित समीर वानखेडे यांच्या टीमने पकडले होते. या प्रकरणामुळे समीर वानखेडेंवर अनेक आरोप झाले होते. दरम्यान आर्यनला ड्रग्ज प्रकरणात क्लीन चिट मिळाली आहे. एनसीबीने कोर्टात आरोपपत्र दाखल करताना आर्यनकडे कोणतेही ड्रग्ज सापडल्याचा पुरावा नाही असे सांगितले आहे. दरम्यान आर्यनला क्लीन चिट मिळाल्यानंतर समीर वानखेडे यांची दुसऱ्यांदा बदली करण्यात आली आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडल्यावर वानखेडेंची बदली आयआरएस विभागात करण्यात आली होती. तर आता आर्यनला क्लीन चिट मिळाल्यानंतर वानखेडेंची पुन्हा डीजीटीएस चेन्नईमध्ये बदली करण्यात आली आहे.

माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची डीजीटीएस चेन्नईमध्ये बदली करण्यात आली आहे. त्यांना करदाते सेवांचे महासंचालक बनवण्यात आलं आहे. समीर वानखेडे यांची बदली करण्यात आलेले पद हे अडगळीचे मानले जाते. दरम्यान आर्यन खान प्रकरण समीर वानखेडे यांना चांगलेच भोवलं असल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात चुकीचा तपास केला असल्याची माहिती एनसीबी अधिकाऱ्यांनी चार्जशीट दाखल करताना दिली आहे. या प्रकरणात आर्यन खानकडे ड्रग्ज सापडले नाही. तसा पुरावाही सापडला नाही. वैद्यकीय तपासणी केली नाही. छापेमारीदरम्यान व्हिडीओग्राफीसुद्धा करण्यात आली नाही अशी माहीती एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी कोर्टात दिली आहे.

- Advertisement -

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीच्या आरोपपत्रात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्लीन चिट मिळाली आहे. यानंतर प्रकरणातील तपास अधिकारी समीर वानखेडे यांनी तपास योग्य केल्याने त्यांच्यावर केंद्र सरकारने कारवाई करण्यास सांगितले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार सक्षम अधिकाऱ्यामार्फत वानखेडे यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यास सरकारने सांगितल्याचे समजते आहे.

समीर वानखेडेंच्या बोगस जात प्रमानपत्र प्रकरणात कारवाई सुरू आहे. NCB ने बॉलीवुड अभिनेता शाहरुख खानच्या मुलगा आर्यन खानला क्रूजवर ड्रग्ज मिळाल्या प्रकरणी क्लीन चीट मिळाली आहे. या प्रकरणात 14 लोकांविरोधा आरोप पत्र दाखल केले आहे. आर्यन खान सह 6 जणांना पुरावे न मिळाल्याने क्लीन चीट मिळाली आहे.

एनसीबीचे डीजी एसएन प्रधान यांच्या म्हणण्यानुसार आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडेच्या टीमने चूक केली. अटकेवेळी समीर वानखेडे या गुन्ह्याचा तपास करत होते. जर एनसीबीकडून चूक झाली नसेल तर एसआयटी तपास आपल्या हातात का घेईल, असे ते म्हणाले.


हेही वाचा : पुढील 24 तासात जीवे मारु, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांना धमकी

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -