घरताज्या घडामोडीएकनाथ शिंदेंनी धर्मवीर चित्रपटात स्वतःच कॅरेक्टर घुसवलं, संदीप देशपाडेंचा आरोप

एकनाथ शिंदेंनी धर्मवीर चित्रपटात स्वतःच कॅरेक्टर घुसवलं, संदीप देशपाडेंचा आरोप

Subscribe

स्वतःच नसलेले कॅरेक्टर पिक्चर मध्ये घुसवल आहे , त्या वेळेला दिघे साहेब असताना ते कुठेच नव्हते ,आता काल्पनिक रित्या स्वतःचं कॅरेक्टर घुसवलय त्यामुळे लोक समजतात या गमतीशीर गोष्टी असल्याचा आरोप पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला.

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काल्पनिकरित्या धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे चित्रपटात स्वतःच कॅरेक्टर घुसवलं अशी टीका मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आणि राजकीय प्रवासावर चित्रपट करण्यात आला आहे. या चित्रपटात ठाण्याचे राजकारणसुद्धा दाखवण्यात आले आहे. ठाण्याचे काही विद्यमान लोकप्रतिनिधींबाबतचे चित्रीकरण या चित्रपटात दाखवले आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या जवळचे मानले जाणारे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्याबाबतसुद्धा माहिती दाखवण्यात आली आहे. परंतु शिंदे यांनी स्वतः काल्पनिकरित्या कॅरेक्टर घुसवलं असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. देशपांडे म्हणाले की, धर्मवीर सिनेमात नगरविकास मंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबत दाखवण्यात आलेल्या प्रसंगाबद्दल देशपांडे यांनी पालकमंत्री शिंदे यांना टोला लगावला. नुसता पिक्चर नाही. स्वतःच नसलेले कॅरेक्टर पिक्चर मध्ये घुसवल आहे. त्या वेळेला दिघे साहेब असताना ते कुठेच नव्हते. आता काल्पनिक रित्या स्वतःचं कॅरेक्टर घुसवलय त्यामुळे लोक समजतात या गमतीशीर गोष्टी असल्याचा आरोप पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला.

- Advertisement -

हजारो कोटींचे रस्ते बांधत आहात थोडीशी कृपा कल्याण डोंबिवली महापालिकेवर करावी, पालकमत्र्यांनी शासनाकडून येणारी महापालिकेची थकबाकी द्यावी जेणेकरून कामगारांचे पैसे मिळतील अशी मागणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी कल्याणात केली. मनसे नेते देशपांडे केडीएमसी मुख्यालयावर मनसेतर्फे कंत्राटी कामगारांच्या मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात उपस्थित होते. ह्या मागण्या त्यांनी महापालिका प्रशासनासमोर मांडल्या आहेत. केडीएमसी मध्ये कार्यरत कंत्राटी कामगारांना किमान वेतन, कोव्हिड भत्ता ,आणि विमा संरक्षनाचे पैसे अदा करावेत या मागण्यासाठी मनसे तर्फे कल्याण पश्चिम सुभाष मैदान ते कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.

कंत्राटी कामगारांना किमान वेतन, कोविड भत्ता, विम्याचे पैसे मिळण्याच्या मागण्यांबाबत अतिरिक्त आयुक्त पवार यांनी आम्हाला आश्र्वासित केल्याचे सांगितले. देशपांडे यांनी पुढे बोलताना सांगितलं महापालिकेची जी आर्थिक स्थिती आहे. त्याबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती केली, हजारो कोटींचे रस्ते बांधत आहात थोडीशी कृपा कल्याण डोंबिवली महापालिकेवर करावी, नाहीतर शासन येवून काय उपयोग , आपल्याच ठिकाणी आपल्याला पैसे मिळणार नसतील तर असा टोला लगावला. पालकमत्र्यांना शासनाकडून येणारी महापालिकेची थकबाकी द्यावी जेणेकरून कामगारांचे पैसे मिळतील अशी विनंती संदीप देशपांडे यांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : … तर काँग्रेस कार्यकर्ता आणि सामान्य माणूस पेटून उठेल, नाना पटोलेंचा भाजपला इशारा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -