घरक्राइमजिल्हा परिषदेचा शाखा अभियंता अ‍ॅण्टीकरप्शनच्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहात पकडले

जिल्हा परिषदेचा शाखा अभियंता अ‍ॅण्टीकरप्शनच्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहात पकडले

Subscribe

नाशिक : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता अमोल घुगे यांना आज लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही कारवाई केली. मुळचे सिन्नर तालुक्यातील असलेले घुगे यांनी याच तालुक्याचे काम अडवल्याची तक्रार अ‍ॅण्टीकरप्शन ब्यूरोकडे प्राप्त झाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत आज घुगे यांना रंगेहाथ पकडले. दीड लाखाची लाच घेतांना पोलिसांनी घुगेला ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात याच विभागाच शेजारी असलेल्या माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांना रंगेहाथ पकडण्यात आलं होतं. या प्रकरणाला वर्ष होत नाही तोच दुसरी कारवाई झाल्यानं जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -