घरताज्या घडामोडीमुंबईत हरितीकरणाला चालना मिळणार; मुंबई ग्रीन योद्धा उपक्रमाला सुरुवात

मुंबईत हरितीकरणाला चालना मिळणार; मुंबई ग्रीन योद्धा उपक्रमाला सुरुवात

Subscribe

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या हस्ते अंधेरीतील वीरा देसाई मार्गावर वृक्षारोपण करून मुंबई वातावरण कृती आराखडा अंतर्गत या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. 

जागतिक पर्यावरण दिनाच्या (International Environment Day) पूर्वसंध्येला मुंबई ग्रीन योद्धा (Mumbai Green Yoddha) उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या हस्ते अंधेरीतील वीरा देसाई मार्गावर वृक्षारोपण करून मुंबई वातावरण कृती आराखडा अंतर्गत या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

वातावरणीय बदलांना सामोरे जाण्यासाठी, पर्यावरण संरक्षण व संवर्धन करण्याच्या हेतूने मुंबई पालिकेने (Mumbai Corporation) मुंबई ग्रीन योद्धा उपक्रमाला सुरुवात केली आहे. यामाध्यमातून मुंबहईतील हरितीकरणाला चालना देण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून आज वृक्षारोपण (Tree Plantation) करण्यात आले. महाराष्ट्र राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली, मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आणि डब्ल्यूआरआय व रेडिओ मिरची यांच्या संयुक्त सहभागाने ग्रीन योद्धा उपक्रम राबवला जात आहे.

- Advertisement -

या वेळी खासदार प्रियांका चतुर्वेदी, सहायक आयुक्त पृथ्वीराज चौहान, महानगरपालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी, सेवानिवृत्त उपायुक्त (पर्यावरण) सुनील गोडसे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -