घरक्राइमलष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्याला उत्तरप्रदेशातून अटक; पुणे एटीएसची कारवाई

लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्याला उत्तरप्रदेशातून अटक; पुणे एटीएसची कारवाई

Subscribe

लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या तरुणाला पुण्याच्या दहशतवादी विरोधी पथकाने अटक (pune ats arrests) केली आहे. इमानूल हक (Inamul Haq) असे या तरूणाचे नाव असून त्याला उत्तर प्रदेशात अटक केली आहे.

लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या तरुणाला पुण्याच्या दहशतवादी विरोधी पथकाने अटक (pune ats arrests) केली आहे. इमानूल हक (Inamul Haq) असे या तरूणाचे नाव असून त्याला उत्तर प्रदेशात अटक केली आहे. (pune ats arrests terrorists inamul haq in uttra pradesh)

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे एटीएने इमानूल हक याला उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये अटक केली. त्यानंतर त्याला पुणे (Pune) न्यायालयात हजर केले जाणार आहे. हा दहशतवादी लष्करसाठी तरुणांची भरती करायचा अशी माहिती मिळते. इनामुल हा जम्मू काश्मीरमधील दहशतवादी संघटनांच्या संपर्कात होता.

- Advertisement -

हेही वाचा – पुलवामामध्ये झालेल्या चकमकीत तीन अतिरेक्यांचा खात्मा, दारुगोळा जप्त

दरम्यान, याआधी बुलडाण्यातील (Buldana) जुनैद मोहम्मद या तरूणाला एटीएसने अटक केली होती. जुनैद हा जम्मू काश्मीरमधील (Jammu Kashmir) दहशतवादी संघटनांच्या संपर्कात होता. तसेच, इमानूलही त्याच्या संपर्कात होता. जुनैद हा १० वी नापास असून तो सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला होता. याप्रकरणी अधिक तपास केला असता, पुणे दहशतवादी विरोधी पथकाने त्याला अटक केली.

- Advertisement -

हेही वाचा – दहशतवादी संघटना अल कायदाची दिल्ली, महाराष्ट्रासह ४ राज्यांमध्ये आत्मघाती हल्ल्याची धमकी

दरम्यान, जुनैद हा लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसाठी काम करत असून त्याला पैसे मिळत होते. या कामासाठी जुनैदने १० हजार रुपये घेतले होते. दिल्ली (Delhi) स्पेशल सेलने महाराष्ट्र एटीएसला जुनैद याच्यावर नजर ठेवण्यास सांगितले होते. त्यानंतर आठवडाभर चौकशी केल्यानंतर १० हजार रुपये घेतल्याचे मोहम्मद जुनैद याने मान्य केले. जुनैद आणि इमानूल हे दोघंही एकमेकांच्या संपर्कात होते.


हेही वाचा – नुपूर शर्मावर कारवाई केल्यानंतर भाजपने गदारोळ करण्याची गरज काय?, नितीश कुमारांचा सवाल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -