घरक्रीडानुपूर शर्मा प्रकरणावर क्रिकेटपटूंनीही ट्विट करत दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

नुपूर शर्मा प्रकरणावर क्रिकेटपटूंनीही ट्विट करत दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Subscribe

प्रेषित पैगंबर मोहम्मद (Prophet Mohammad) यांच्याबद्दल भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी पक्षातून त्यांना निलंबन करण्यात आलं आहे. तसेच संपूर्ण देशभरासह विदेशातून त्यांच्याविरुद्ध विविध ठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहेत. मात्र, आता क्रिकेट जगतातूनही याप्रकरणी प्रतिक्रिया येत आहेत. भारताचा माजी क्रिकेटर गौतम गंभीर, व्यंकटेश प्रसाद आणि पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज आणि क्रिकेटपटू शोएब अख्तर यांनी ट्वीट करत आपलं मत नोंदवलं आहे.

भारताचा माजी क्रिकेटर गौतम गंभीर यांनी नुपूर शर्मा यांच्याबाबत एक ट्विट करत आपली प्रतिक्रिया मांडली आहे. माफी मागणार्‍या एका महिलेविरुद्ध देशभरातून द्वेष आणि जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. तथाकथित सेक्युलरवादी शांत बसलेले दिसत आहेत.

- Advertisement -

गौतम गंभीर पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरनेही ट्वीट केलं आहे. पैगंबर मोहम्मद आमच्यासाठी सर्वस्व असून आमचं जीवन-मरणं हे सर्व त्यांच्यासाठी आहे. हा असा प्रकार भविष्यात अजिबात घडता कामा नये. भारत सरकारने पैगंबर मोहम्मद यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजप प्रवक्त्यांना निलंबन करण्याचा निर्णय घेतला, हे स्वागतार्ह आहे, असं शोएब अख्तर म्हणाला.

- Advertisement -

नुपूर शर्मा यांच्या या वक्तव्याबद्दल व्यंकटेश प्रसाद याने देखील ट्वीट करत एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो कर्नाटकमधील आहे. नुपूर शर्मांचा पुतळा कर्नाटकातील एका रस्त्यावर लटकलेला अवस्थेत दिसत आहे. हे सगळं पाहून आपण २१ व्या शतकात आहोत असं वाटत नाही. मी सर्वांना विनंती करेन की, राजकारण बाजूला ठेवा आणि विवेकाचा विजय होऊ द्या, असं ट्विट व्यंकटेश प्रसादने केलं आहे.


हेही वाचा :  लोकशाहीसाठी नाही, तर कोटींची संपत्ती वाचवण्याचा प्रयत्न; स्मृती इराणींचा काँग्रेसवर हल्लाबोल


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -