घरमहाराष्ट्रशिकाऊ डॉक्टरांकडून चुकीचे इंजेक्शन, कूपर रुग्णालयातील रुग्णाने गमावली दृष्टी

शिकाऊ डॉक्टरांकडून चुकीचे इंजेक्शन, कूपर रुग्णालयातील रुग्णाने गमावली दृष्टी

Subscribe

मुंबई पालिकेच्या कूपर रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या मुलाने जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

शिकाऊ डॉक्टरने चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे एका ५८ वर्षीय महिलेला आपली दृष्टी गमवावी लागली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई पालिकेच्या कूपर रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या मुलाने जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (Wrong injection from trainee doctor, Cooper hospital patient loses sight)

रमिला पुरुषोत्तम वाघेला असं या महिलेचं नाव असून त्या अंधेरी पूर्वेकडील सहारगाव येथे राहतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांना मोतीबिंदूचा त्रास होत होता. याकरता त्यांनी विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयामध्ये उपचार सुरू केले. मोदीबिंदूसाठी त्यांना शस्त्रक्रिया करण्यास सांगितले. मात्र, शस्त्रक्रियेदरम्यान कूपर रुग्णालयाच्या शिकाऊ डॉक्टरांनी चुकीचे इंजेक्शन आणि औषध दिल्यामुळे रमिला यांची दृष्टी गेल्याचा आरोप महिलेच्या मुलाने केला आहे.

- Advertisement -


याप्रकरणी दोषी डॉक्टरांवर कडक कारवाई करण्याची मागणी शिवसेना नेते इंतेखाब फारुकी यांनी केली. जर कारवाई केली नाही तर कूपर रुग्णालयाच्या बाहेर जोरदार आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, महिलेच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. महिलेला दिलेल्या इंजेक्शनचे नमुने ताब्यात घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले असून रुग्णालय या संदर्भात तपास करत आहे. हलगर्जीपणा समोर आल्याने कुटुंबाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सध्या हॉस्पिटकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -