घरक्राइमपुलवामामध्ये दहशतवाद्यांकडून पोलिसाची घरात घुसून हत्या

पुलवामामध्ये दहशतवाद्यांकडून पोलिसाची घरात घुसून हत्या

Subscribe

गेल्या अनेक दिवसांपासून जम्मू आणि काश्मिरमध्ये (Jammu and Kashmir) दहशतवाद्यांकडून हल्ला केला जात आहे. गोळीबार (Firing) करत त्यांची हत्या केली जात आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून जम्मू आणि काश्मिरमध्ये (Jammu and Kashmir) दहशतवाद्यांकडून हल्ला केला जात आहे. गोळीबार (Firing) करत त्यांची हत्या केली जात आहे. अशातच आता दहशतवाद्यांनी (Terroris) पोलीस उपनिरीक्षकाच्या घरात घुसून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना पुलवामामध्ये घडली. फारूख अहमद मीर असे मृत्यू पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. शुक्रवारी रात्री उशिरा हि घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. (jammu kashmir pulwama police sub inspector shot dead inside his home by terrorists)

मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी फारूख अहमद मीर यांच्या घरातून त्यांचे अपहरण केले आणि त्यांना शेतात नेऊन त्यांच्यावर गोळीबार केला. हा हल्ला करणाऱ्यांची नावे अद्याप अस्पष्ट आहेत. याप्रकरणी सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – जम्मू- काश्मीरमधील काश्मिरी पंडितांची जिल्हा मुख्यालयात बदली, मुख्य शिक्षण अधिकाऱ्यांचा निर्णय

या घटनेमुळे काश्मिर खोऱ्यात पुन्हा एकदा टार्गेट किलिंगची चिंता वाढली आहे. दरम्यान, याआधी ७ मे रोजी जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी एका पोलिसाला गोळ्या घालून जखमी केले होते. या घटनेबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या कॉन्स्टेबलला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा – जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार; एका परप्रांतीय मजुराचा मृत्यू

गेल्या काही महिन्यांपासून घाटीमध्ये दहशतवादी अधिक सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. सुरक्षा दलाकडूनही त्यांनी वेळोवेळी चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांकडून सतत होणाऱ्या गोळीबारामुळे जम्मू आणि काश्मीरीमधील कश्मिरी पंडितांनी एकत्र पलयनाचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – अग्निपथ योजनेत मोठा बदल, सीआरपीएफ आणि आसाम रायफल्ससाठी महत्त्वाचा निर्णय

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -