घरताज्या घडामोडीमला पिस्तूल आणि गोळ्या बनवायला सांगितल्या, दाभोळकर खून प्रकरणातील साक्षीदाराचा जबाब

मला पिस्तूल आणि गोळ्या बनवायला सांगितल्या, दाभोळकर खून प्रकरणातील साक्षीदाराचा जबाब

Subscribe

वीरेंद्र तावडे यांनी पिस्तूल आणि गोळ्या बनवायला सांगितल्या परंतु मी बनवल्या नाही. तावडे यांची भेट हिंदू संघटनांच्या बैठकांदरम्यान झाली होती.

डॉ. नरेंद्र दाभोळकर खून प्रकरणात आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. दाभोळकर यांच्या गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांची अनेक वर्षांनंतर ओळख पटली. तर आता एका साक्षीदाराने आपल्याला बंदूक बनवण्यासाठी सांगितले असल्याचा जबाब दिला आहे. कोल्हापूरच्या संजय साडविलकर यांनी साक्ष देताना विरेंद्र तावडे यांनी पिस्तूल आणि गोळ्या बनवण्यासाठी सांगितले होते असे सांगितले आहे. संजय साडविलकर यांनी न्यायालयात साक्ष दिले आहेत.

कोल्हापूरचे संजय साडविलकर यांनी न्यायालयात डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या मारेकऱ्यांनी साक्ष दिली आहेत. साडविलकर यांनी साक्ष देताना सांगितले की, वीरेंद्र तावडे यांनी पिस्तूल आणि गोळ्या बनवायला सांगितल्या परंतु मी बनवल्या नाही. तावडे यांची भेट हिंदू संघटनांच्या बैठकांदरम्यान झाली होती. डॉ. वीरेंद्र तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अ‍ॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले आहेत.

- Advertisement -

दाभोळकरांना मारण्यासाठी मारेकरी दुचाकीवरुन आले

सरकारी वकील प्रकाश सुर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे महानगरपालिकामध्ये सफाई काम करणाऱ्या किरण कांबळे (४६) यांनी कोर्टात साक्ष देताना सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांची ओळख पटवली आहे. दाभोळकरांना मारण्यासाठी दोन जण मोटार सायकलवरुन आले आणि त्यांना गोळ्या घातल्या असल्याची साक्ष त्यांनी कोर्टात दिली आहेत.

पुण्यातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलाच्या दुभाजकावर सकाळच्या सुमारास काम संपवून प्रत्यक्षदर्शी किरण कांबळे आणि त्यांच्यासह एक स्त्री असे दोघे बसले होते. यावेळी अचानक फटाके फुटल्याचा आवाज आला, आवाजाच्या दिशेने पाहिले तेव्हा एका व्यक्तिला दोघे गोळ्या झाडत असताना दिसले असल्याचे सरकारी वकीलांनी सांगितले.

- Advertisement -

यानंतर कांबळे ज्या दिशेला बसले होते त्या दिशेला आरोपी पळाले. तिथे जवळच असलेल्या चौकीजवळ दोघांनी मोटार सायकल पार्क केली होती. मोटार सायकलवर बसून घटनास्ठळावरुन पलायन केले. आरोपी पळाल्यानंतर कांबळे घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या व्यक्तिकडे (दाभोळकर) पोहोचले आणि पुढच्या त्यांच्या कामासाठी गेले असल्याचे कांबळेंनी कोर्टात सांगितले आहे.


हेही वाचा : Dabholkar murder case : नरेंद्र दाभोळकर खून प्रकरणात मोठी घडामोड, ९ वर्षानंतर पटली खुन्यांची ओळख

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -