घरताज्या घडामोडीपंतप्रधान मोदींनी तरुणांना बेरोजगारीच्या अग्निपथवर चालण्यास मजबूर केलं, राहुल गांधींची टीका

पंतप्रधान मोदींनी तरुणांना बेरोजगारीच्या अग्निपथवर चालण्यास मजबूर केलं, राहुल गांधींची टीका

Subscribe

८ वर्षात १६ कोटी नोकऱ्या द्यायला हव्यात परंतु तरुणांना फक्त पकोडो तळण्याचे ज्ञान मिळाले आहे. देशाच्या अशा अवस्थेला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत.

काँग्रेस माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी अग्निपथ योजनेवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारने सैन्यात भरतीसाठी अग्निपथ योजना आणली आहे. या योजनेंतर्गत तरुणांना देशसेवा करण्यासाठी संधी मिळणार आहे. परंतु या योजनेवरुन अनेक तरुणांनी संताप व्यक्त केला आहे. अग्निपथ योजनेत केवळ ४ वर्षांचा सेवाकाळ देण्यात आला आहे. यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र डागण्यात येत आहे. अग्निपथ योजना आणून युवकांना बेरोजगारीच्या अग्निपथावर चालण्यास मजबूर केलं आहे असे राहुल गांधी म्हणाले.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ट्विट करत अग्निपथ योजनेचा विरोध केला आहे. अग्निपथ योजनेवर काँग्रेसकडूनसुद्धा आक्षेप घेण्यात आला आहे. राहुल गांधी ट्विट करत म्हणाले की, वारंवार नोकरीची खोटी आशा दाखवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांना बेरोजगारीच्या अग्निपथवर चालण्यास भाग पाडले आहे. ८ वर्षात १६ कोटी नोकऱ्या द्यायला हव्यात परंतु तरुणांना फक्त पकोडो तळण्याचे ज्ञान मिळाले आहे. देशाच्या अशा अवस्थेला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत.

- Advertisement -

कृषी कायद्यांनुसार अग्निपथ योजना मागे घ्यावी लागणार

केंद्र सरकारला अग्निपथ योजना कृषी कायद्यांनुसार मागे घ्यावी लागणार असा इशारा राहुल गांधी यांनी दिला आहे. केंद्र सरकार सलग आठ वर्षांपासून ‘जय जवान, जय किसान’च्या मूल्यांचा “अपमान” करत आहे. पंतप्रधानांना काळे कृषी कायदे मागे घ्यावा लागेल, असे मी यापूर्वीही म्हटले होते. त्याचप्रमाणे त्याला ‘माफिवीर’ बनून देशातील तरुणाईची आज्ञा पाळावी लागेल आणि ‘अग्निपथ’ परत घ्यावा लागेल असे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

अग्निपथ योजनेला देशातील उत्तरेकडील राज्यात मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात येत आहे. बिहारमध्ये आतापर्यंत २२ जिल्ह्यांमध्ये अग्निपथ योजनेविरोधात हिंसक घटना घडल्या आहेत, तर शनिवारी पुकारण्यात आलेल्या बिहार बंदच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून बिहारमधील बहुतांश जिल्ह्यांत मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. देशभरातून अग्निपथ योजनेला विरोध होत असून याचा सर्वाधिक फटका भारतीय रेल्वेला बसला आहे. आतापर्यंत ३४० गाड्यांवर परिणाम झाल्याने रेल्वेचे ४० कोटींहून अधिक नुकसान झाले आहे.


हेही वाचा : मुंबईकरांच्या तणावमुक्तीसाठी संडे स्ट्रीट मोहीम; पोलीस आयुक्तांच्या मोहिमेला गृहमंत्री, अक्षयकुमारची भेट

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -