घरमुंबईराष्ट्रवादीची जी भूमिका आहे तिच माझी भूमिका - श्यामसुंदर शिंदे

राष्ट्रवादीची जी भूमिका आहे तिच माझी भूमिका – श्यामसुंदर शिंदे

Subscribe

राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव केला. हा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे. पराभवावर बोलताना खासदार संजय राऊत यांनी बविआचे तीन आमदार आणि तीन अपक्ष आमदारांचे नाव घेत त्यांनी मतदान केले नाही, असा आरोप केला. त्यात नांदेड जिल्ह्याती लोह्याचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांचे नाव होते. यानंतर आता श्यामसुंदर शिंदे यांनी शिवसेनेबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

काय म्हणाले श्यामसुंदर शिंदे –

- Advertisement -

यावर त्यांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे. राष्ट्रवादीची जी भूमिका आहे तिच माझी भूमिका आहे. मी संजय राऊत यांच्याशी संपर्क केला नाही. मी त्यांना भेटणार नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा सहयोगी आमदार आहे. आज महत्व वाढले हे नक्की आहे. शिवसेनेने मला विचारले तर मी सांगेन काय नाराजी आहे ते. जे आरोप केले ते परत परत सांगायची गरज नाही. ते गुप्त मतदान होते. त्यामुळे कुणी मत दिले ते कुणी सांगू शकणार नाही. आता विधान परिषदेत विजय कुणाचा होणार हे मी सांगू शकत नाही. मी काही भविष्य सांगणारा नाही, अशा शब्दात त्यांनी भूमिका स्पष्ट केली.

खडसे आणि हितेंद्र ठाकूर भेट – 

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार एकनाथ खडसे यांनी आज मतदानासाठी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी तासभर चर्चा केली. यानंतर भाजपच्या काही आमदारांना खडसे यांनी फोन केल्याचे वृत्त आहे. यावेळी खडसे यांनी तुम्हाला मला मदत करावीच लागेल, असे आमदारांशी बोलने झाल्याचे सांगितले जात आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -